VIDEO : माहीची ‘ती’ जागा अजूनही रिकामी! धोनीच्या आठवणीत भावुक झाला चहल

VIDEO : माहीची ‘ती’ जागा अजूनही रिकामी! धोनीच्या आठवणीत भावुक झाला चहल

सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला येत आहे धोनीची आठवण.

  • Share this:

हॅमिल्टन, 28 जानेवारी : भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर शानदार प्रदर्शन करत आहेत. पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत विराटसेनेनं आतापर्यंत दोन टी-20 सामन्यात बाजी मारली आहे. आता तिसरा सामना हॅमिल्टन येथे 29 जानेवारीला खेळला जाईल. या सामन्यात विजय मिळवत ही मालिका खिशात घालण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे.

हॅमिल्टनमध्ये होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ तेथे पोहचला आहे. यावेळी युजवेंद्र चहलनं प्रसिद्ध अशा चहल टिव्हीच्या माध्यमातून खेळाडूंची संवाद साधला. चहलने केएल राहुल, ऋषभ पंत, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह यांच्याशी संवाद साधला. मात्र याच दरम्यान धोनीबाबत बोलताना चहल भावुक झाला.

वाचा-...आणि श्रेयस अय्यर म्हणाला मराठीत सांगू का?, VIDEO VIRAL

वाचा-‘पंत बडबड करतो आणि राहुल करून दाखवतो’, दिग्गज क्रिकेटपटूने केली ऋषभची मस्करी

चहलनं काढली धोनीची आठवण

बीसीसीआय टिव्हीने एक व्हिडीओ पोस्ट करत धोनीची आठवण काढली. टीम इंडियाच्या बसमध्ये सर्वात मागच्या सीटवर जाऊन चहलनं आजही ही जागा धोनीसाठी आम्ही राखीव ठेवली आहे असे सांगत माही भाईची आठवण येत असल्याचे सांगितले. धोनी वर्ल्ड कप 2019नंतर टीम इंडियाच्या बाहेर आहे. त्यानं एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. मात्र आता धोनीला भारतीय संघात संधी मिळेल की नाही, याबाबत शंका आहे. तरी, धोनीला ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये संधी मिळू शकते.

वाचा-अनुष्का-विराटच्या कमाईत तीनपट वाढ, दोघं मिळून विकत घेऊ शकतात अनेक देश

चहलनं बुमराहसह सर्व खेळाडूंची घेतली फिरकी

युजवेंद्र चहलने प्रथम भारताचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याशी बोलले. युजवेंद्र चहलने विनोदात बुमराहशी केवळ बोलण्यासाठी पैसे मोजावे लागतात असे सांगितले. बुमराहशी बोलण्यासाठी त्याने आपल्या मॅनेजरला 50 लाख रुपये दिले असल्याचे त्यांनी सांगितले. चहलच्या बोलण्यावर बुमराह हसला. तो म्हणाला, 'मी प्रथमच न्यूझीलंडला आलो आहे आणि मी येथे आनंद घेत आहे. आतापर्यंत ते खूप चांगले झाले आहे. यानंतर चहलने बुमराहला विचारले की तू माझ्याबरोबर जेवायला का जात नाहीस? यावर बुमराह म्हणाले की तुम्ही कॉल केल्यास मी नक्की येईन. बुमराह दुखापतीतून सावरत सध्या दोन महिन्यांनंतर क्रिकेट खेळत आहे.

First published: January 28, 2020, 8:52 AM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading