मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

जखमी Mohammed Sirajने वेदना होत असतानाही पुर्ण केली ओव्हर, जिंकली सर्वांची मनं

जखमी Mohammed Sirajने वेदना होत असतानाही पुर्ण केली ओव्हर, जिंकली सर्वांची मनं

Mohammad Siraj

Mohammad Siraj

जयपूर येथे झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने दिलेले 165 धावांचे लक्ष्य भारताने 19.4 षटकांत गाठत तीन सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

  • Published by:  Dhanshri Otari

जयपूर, 18 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात बुधवारी (17 नोव्हेंबर) रोजी टी20 मालिकेतील पहिला सामना झाला. टीम इंडियानं हा सामना 5 विकेट्स आणि 2 बॉल राखून जिंकला. टीम इंडियाच्या या विजयासोबत क्रिकेट जगतात मोहम्मद सिराजचे (Mohammed Siraj) कौतुक होत आहे.

बॉलिंग दरम्यान, टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या हाताला जोराचा चेंडू लागला पण, सिराजच्या ने दुर्लक्ष करत आपले लक्ष खेळाकडे केंद्रित केले. त्याच्या याच भूमिकेवर सध्या सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टीम इंडिया जेव्हा गोलंदाजी करत होती तेव्हा मोहम्मद सिराजकडे शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी देण्यात आली होती . 20व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मोहम्मद सिराजच्या हाताला दुखापत झाली. मिचेल सँटनरने खेळलेला शॉट थेट सिराजच्या हातावर आदळला. त्यानंतर प्राथमिक उपचार घेत सिराजनं ते षटक पूर्ण केलं आणि अवघ्या पाच धावा देत एक विकेटही घेतली. त्याच्या याच खेळीने त्याने सर्वांची मनं जिंकली आहेत.

20व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मोहम्मद सिराजने रचिन रवींद्रला बोल्ड केले. खरतर मोहम्मद सिराज या षटकात महागडा खेळाडू ठरला. त्याने 4 षटकांत 39 धावा दिल्या.

मोहम्मद सिराजने अशाप्रकारे क्रिकेट चाहत्यांची मने जिंकण्याची ही पहिलीच वेळ नाही. ऑस्ट्रेलियाचा दौरा असो की इंग्लंडचा दौरा, मोहम्मद सिराज सातत्याने संघासाठी चांगला खेळ दाखवत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोहम्मद सिराजच्या वडिलांचे निधन झाले, मात्र ते संघासोबतच राहिला होता.

First published:

Tags: New zealand, Team india