हॅमिल्टन, 27 नोव्हेंबर: टीम इंडियाच्या यंदाच्या न्यूझीलंड दौऱ्यात पावसानं मात्र चांगलाच गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. टी20 मालिकेतल्या 2 मॅचमध्ये पावसाचा फटका बसला. त्यात आता वन डे मालिकेतही पावसानं व्यत्यय आणला आहे. ऑकलंडची पहिली वन डे निर्विघ्नपणे पार पडली. पण आज अवघ्या 4.5 ओव्हर्सचा खेळ झाल्यानंतर हॅमिल्टनची दुसरी वन डे थांबववण्यात आली. पावसाची रिपरिपर सुरुच राहिल्यानं अद्याप खेळ सुरु झालेला नाही. पण यादरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे.
Rain delays are for catch-ups! 😃 Follow the match 👉 https://t.co/frOtF82cQ4 #TeamIndia | #NZvIND pic.twitter.com/KdO5l8WKWL
— BCCI (@BCCI) November 27, 2022
ओव्हर्स कमी होणार
दरम्यान जवळपास दोन तासांचा खेळ वाया गेल्यानं मॅचमध्ये आता बऱ्याच ओव्हर्स कमी होणार आहेत. पण हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा पाऊस कमी होईल. हॅमिल्टनमध्ये आज दिवसभर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यामुळे ही मॅच पुन्हा सुरु होणार की नाही हाही प्रश्न आहे. जर पाऊस थांबला आणि मॅच सुरु झाली तर आता कमी ओव्हर्सची मॅच पाहायला मिळेल.
Just when we looked set for a pitch inspection, it has started to drizzle again.
The covers are back on. Follow the match 👉 https://t.co/frOtF82cQ4 #TeamIndia | #NZvIND pic.twitter.com/bbnI8wCbtx — BCCI (@BCCI) November 27, 2022
हेही वाचा - Cricket: ना पाऊस, ना बॅडलाईट... या अनोख्या कारणासाठी अम्पायर्सनी थांबवली मॅच, पाहा काय घडलं?
4.5 ओव्हर्सचा खेळ
दरम्यान सामन्याआधी न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून टीम इंडियाला बॅटिंगचं आमंत्रण दिलं होतं. त्यानंतर शुबमन गिल आणि शिखर धवन या जोडीनं भारताला 4.5 ओव्हर्समध्ये बिनबाद 22 धावांची मजल मारुन दिली होती. पण त्यानंतर पावसाला सुरुवात झाली आणि अम्पायर्सनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, Sports