• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs NZ 2nd T20 LIVE Streaming: दुसरी T20 कधी आणि कुठे पाहता येणार?

IND vs NZ 2nd T20 LIVE Streaming: दुसरी T20 कधी आणि कुठे पाहता येणार?

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील दुसरी टी20 मॅच रांचीमध्ये होणार आहे. तीन टी20 मॅचच्या या मालिकेत पहिली टी20 टीम इंडियानं जिंकली आहे.

 • Share this:
  रांची, 19 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील दुसरी टी20 मॅच रांचीमध्ये होणार आहे. तीन टी20 मॅचच्या या मालिकेत पहिली टी20 टीम इंडियानं जिंकली आहे. आता रांचीमधील दुसरी मॅच देखील जिंकत मालिका जिंकण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. जयपूरमध्ये झालेल्या मॅचमध्ये न्यूझीलंडच्या मिचेल सँटनरनं मारलेला बॉल मोहम्मद सिराजच्या हाताला लागला होता. त्यामुळे जखमी झालेला सिराजचं या मॅचमध्ये खेळणे अनिश्चित आहे. रांचीमधील झारखंड क्रिकेट असोसिएशनचे मैदान साधारणपणे बॅटींगला अनुकूल आहे. पण, संध्याकाळी मैदानात दव पडत असल्यानं टॉसचा निर्णय कुणाच्या बाजूने लागतो ते महत्त्वाचे ठरणार आहे. टॉस जिंकणारा कॅप्टन पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेईल. न्यूझीलंडला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी ही मॅच कोणत्याही परिस्थितीत जिंकणे आवश्यक आहे. किती वाजता सुरू होणार मॅच? भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील दुसरी टी20  19 नोव्हेंबर रोजी शुक्रवारी रांचीमध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. तर टॉस 6.30 वाजता होईल. कुठे होणार लाईव्ह प्रसारण? या मॅचचं लाईव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे. लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार? भारत विरुद्ध न्यूझीलंड मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवरही पाहता येणार आहे. IND vs PAK 2022: ... तर भारत-पाकिस्तान मॅचसाठी करावी लागणार नाही वर्ल्ड कपची प्रतीक्षा टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, आर.अश्विन, युझवेंद्र चहल, दीपक चहर, आवेश खान, मोहम्मद सिराज, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल आणि हर्षल पटेल न्यूझीलंडची टीम:  टीम साऊदी (कॅप्टन), ट्रेन्ट बोल्ट, मार्टीन गप्टील, डॅरेल मिचेल, टीम सिफर्ट, ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, रचिन रविंद्र, मिचेल स्टँनर, लॉकी फर्ग्युसन, अ‍ॅडम मिल्ने, मार्क चॅपमन, आणि इश सोधी
  Published by:News18 Desk
  First published: