• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs NZ 1st T20 LIVE Streaming: पहिली T20 कधी आणि कुठे पाहता येणार?

IND vs NZ 1st T20 LIVE Streaming: पहिली T20 कधी आणि कुठे पाहता येणार?

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील तीन टी20 आणि 2 टेस्ट मॅचच्या मालिकेला आजपासून (बुधवार) जयपूरमध्ये सुरूवात होत आहे.

 • Share this:
  जयपूर, 17 नोव्हेंबर:  भारत विरुद्ध न्यूझीलंड  (India vs New Zealand)  यांच्यातील तीन टी20 आणि 2 टेस्ट मॅचच्या मालिकेला आजपासून (बुधवार) जयपूरमध्ये सुरूवात होत आहे. नुकत्याच झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं आव्हान सुपर 12 मध्येच समाप्त झाले होते. तर न्यूझीलंडचा फायनलमध्ये पराभव झाला. दोन जखमी टीममध्ये ही टी20 मालिका होणार आहे. दोन्ही टीम जुन्या आठवणी विसरून नव्या जोमानं या मालिकेला सुरूवात करतील. टीम इंडियानं या सीरिजमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंना विश्रांती दिली असून तरूण खेळाडूंना संधी दिली आहे. या मालिकेत टीम इंडियात प्रयोग होणार असून त्याचा फायदा तरूण खेळाडू कसं उठवणार हे समजणार आहे. रोहित शर्मा आणि राहुल द्रविड या कॅप्टन-मुख्य प्रशिक्षक जोडीची ही पहिलीच स्पर्धा आहे. त्यामुळे याची टीम इंडियाच्या फॅन्सना मोठी उत्सुकता आहे. न्यूझीलंडनं कॅप्टन केन विल्यमसनला (Kane Williamson) विश्रांती दिली आहे. केन आता टेस्ट सीरिजमध्ये मैदानात उतरेल. विल्यमसनच्या जागी टीम साऊदी (Tim Southee) टीमचं नेतृत्त्व करेल. न्यूझीलंडच्या टीममध्ये अनेक टी20 स्पेशालिस्ट खेळाडूंचा समावेश आहे. त्यांना हरवण्यासाठी टीम इंडियाला चांगलाच घाम गाळावा लागेल. किती वाजता सुरू होणार मॅच? भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील पहिली टी20  17 नोव्हेंबर रोजी बुधवारी जयपूरमध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. तर टॉस 6.30 वाजता होईल. कुठे होणार लाईव्ह प्रसारण? या मॅचचं लाईव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे. लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार? भारत विरुद्ध न्यूझीलंड मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवरही पाहता येणार आहे. टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, आर.अश्विन, युझवेंद्र चहल, दीपक चहर, आवेश खान, मोहम्मद सिराज, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल आणि हर्षल पटेल Ashes सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया टीम जाहीर, T20 वर्ल्ड कप गाजवणाऱ्या खेळाडूंना जागा नाही न्यूझीलंडची टीम:  टीम साऊदी (कॅप्टन), ट्रेन्ट बोल्ट, मार्टीन गप्टील, डॅरेल मिचेल, टीम सिफर्ट, ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, मिचेल स्टँनर, लॉकी फर्ग्युसन, अ‍ॅडम मिल्ने, मार्क चॅपमन, आणि इश सोधी
  Published by:News18 Desk
  First published: