Home /News /sport /

IND vs NZ: आज टीम इंडिया रचणार इतिहास, पण पाऊस फिरवणार विराटसेनेच्या इराद्यांवर पाणी!

IND vs NZ: आज टीम इंडिया रचणार इतिहास, पण पाऊस फिरवणार विराटसेनेच्या इराद्यांवर पाणी!

न्यूझीलंडचा पराभव करून मालिका विजयासह इतिहास रचण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल. याआधी पाच सामन्यांच्या मालिकेत भारतानं पहिले दोन सामने जिंकत 2-0ने आघाडी घेतली आहे.

    हॅमिल्टन, 29 जानेवारी : विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध आज तिसरा सामना खेळणार आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून मालिका विजयासह इतिहास रचण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल. याआधी पाच सामन्यांच्या मालिकेत भारतानं पहिले दोन सामने जिंकत 2-0ने आघाडी घेतली आहे. त्यामुळ मालिकेवर कब्जा मिळवण्यासाठी विराटसेना आज मैदानात उतरले. दरम्यान टीम इंडियाने आज मालिका विजय मिळवल्यास न्यूझीलंडच्या भूमीत टी-20 मालिका जिंकण्याचा इतिहास विराटसेना रचेल. मात्र भारताच्या इतिहास रचण्याच्या इराद्यावर पाऊस फिरवू शकतो. आजच्या सामन्यात पाऊस महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. अ‍ॅक्यूवेदरच्या अहवालानुसा आज दिवसभर आकाश ढगाळ असेल आणि रात्री 12च्या सुमारास पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ पहिल्या डावात पावसामुळे संघाला मोठा त्रास होऊ शकतो. त्याच वेळी दोन वाजता पावसाची शक्यता 51 टक्के आहे. तपमानाबद्दल सांगायचे झाल्यास, कमाल तापमान 26 डिग्रीच्या जवळपास आणि किमान तापमान 18 डिग्रीच्या जवळ असू शकते. दोन वाजेनंतर पावसाचा अंदाज नसला तरी आकाश ढगाळ असेल आणि ओल्या मैदानामुळे दोन्ही संघांना त्रास होईल. वाचा-U19 Ind Vs Aus : भारतीय यंग ब्रिगेडची कमाल, ऑस्ट्रेलियाला लोळवून सेमीफायनलमध्ये एक विजय आणि टीम इंडिया रचणार इतिहास भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या सुरू असलेल्या टी -20 मालिकेपूर्वी फक्त दोन टी -20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळल्या गेल्या आहेत. या दोन्ही टी -20 मालिकेत न्यूझीलंडकडून भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. 2008-2009मध्ये एक टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळली गेली होती. या दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारताला 0-2ने पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर, 2018-2019 मध्ये खेळल्या गेलेल्या टी -20 आंतरराष्ट्रीय मालिकेत न्यूझीलंडकडून भारताचा 2-1 असा पराभव झाला. त्यामुळं 2-0ने आघाडी घेतलेला भारत ही मालिका जिंकताच एक इतिहास रचेल. वाचा-वनडेमध्ये धमाका! 48 षटकार आणि 70 चौकारासह फलंदाजांनी चोपल्या 818 धावा मालिकेवर भारताचे वर्चस्व पाच सामन्यांच्या या मालिकेत भारताचे प्रदर्शन जबरदस्त राहिले आहे. टीम इंडियाचे पहिले दोन्हीही सामने एकहातील जिंकले. मालिकेचे दोन्ही सलामीचे सामने ऑकलंडमध्ये खेळले गेले होते. तेथे भारताचा सलामीवीर केएल राहुलने दोन्ही सामन्यांमध्ये फलंदाजी केली आणि तिसर्‍या अर्धशतकाच्या आधारे हे आव्हान सहज पार केले. त्याचबरोबर, भारतीय कर्णधार कोहलीही जागतिक विक्रमाच्या अगदी जवळ आहे. कोहलीने आज अर्धशतक दिले तर कर्णधार म्हणून तो टी -20 क्रिकेटमध्ये 9 अर्धशतके ठोकण्याचा विश्वविक्रम करेल. सध्या तो फाफ डू प्लेसी, केन विल्यमसनसह आठ अर्धशतकांसह संयुक्त क्रमांकावर आहे. तसेच, टी -20 क्रिकेटमध्ये विराट कोहलीचे 24 अर्धशतक आहे. टी -20 क्रिकेटमध्ये कोहली सध्या सर्वाधिक 4645 धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 80 सामन्यात 51.79 च्या सरासरीने ही धावा केल्या आहेत. वाचा-न्यूझीलंडमध्ये आणखी एक विजय आणि विराटसेना रचणार इतिहास!
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या