• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs NZ 1st T20 : टीम इंडियाची नवी सुरुवात, हा खेळाडू करणार पदार्पण, अशी असणार रोहितची Playing XI

IND vs NZ 1st T20 : टीम इंडियाची नवी सुरुवात, हा खेळाडू करणार पदार्पण, अशी असणार रोहितची Playing XI

PHOTO- BCCI

PHOTO- BCCI

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand 1st T20) यांच्यातल्या तीन टी-20 मॅचच्या सीरिज आजपासून जयपूरमध्ये सुरू होत आहे. विराट कोहलीने टी-20 टीमचं नेतृत्व सोडल्यानंतर रोहित शर्माकडे (Rohit Sharma) ही जबाबदारी आली आहे. तर राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे.

 • Share this:
  जयपूर, 17 नोव्हेंबर : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand 1st T20) यांच्यातल्या तीन टी-20 मॅचच्या सीरिज आजपासून जयपूरमध्ये सुरू होत आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) निराशाजनक कामगिरी केल्यानंतर पुन्हा नवी सुरुवात करण्यासाठी भारतीय टीम सज्ज आहे. विराट कोहलीने टी-20 टीमचं नेतृत्व सोडल्यानंतर रोहित शर्माकडे (Rohit Sharma) ही जबाबदारी आली आहे. तर राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे. या सामन्यातून व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. व्यंकटेश अय्यरकडे हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) पर्याय म्हणून पाहिलं जात आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या या सीरिजमध्ये व्यंकटेश अय्यरला फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून तयार करता येईल का नाही, हे पाहिलं जाऊ शकतं. आयपीएलमध्ये (IPL 2021) केकेआरकडून (KKR) खेळताना व्यंकटेशने मोठे शॉट खेळत आक्रमक बॅटिंग केली होती. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाड, हर्षल पटेल, आवेश खान आणि युझवेंद्र चहल यांचीही टीम इंडियात निवड करण्यात आली आहे. जसप्रीत बुमराहला या सीरिजमधून आराम दिला आहे, त्यामुळे टीम 140 किमी वेगाने बॉलिंग करणाऱ्या खेळाडूचा शोध घ्यायचा प्रयत्न करेल, यासाठी आवेश खान आणि मोहम्मद सिराज हे दोन पर्याय आहेत. भुवनेश्वर कुमारची टी-20 वर्ल्ड कपमधली कामगिरी निराशाजनक झाली होती, त्यामुळे त्याच्यासाठी ही सीरिज अखेरची संधी ठरू शकते. टीमकडे रोहित आणि राहुल हे ओपनिंगसाठीचे पर्याय निश्चित असले तरी ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड टीममध्ये असल्यामुळे काही प्रयोगही केले जाऊ शकतात. शिवाय व्यंकटेश अय्यर आयपीएलमध्ये केकेआरसाठी ओपनिंगला खेळायचा, पण तो मधल्या फळीत खेळण्यासाठी तयार आहे. सूर्यकुमार यादवलाही टी-20 वर्ल्ड कपमध्ये सूर गवसला नाही, पण ऑस्ट्रेलियातला पुढचा टी-20 वर्ल्ड कप 11 महिन्यांवर आला असल्यामुळे त्याला चौथ्या क्रमांकासाठी तयार केलं जाऊ शकतं. रवींद्र जडेजाला आराम दिल्यामुळे अक्षर पटेल स्पिन बॉलिंग ऑलराऊंडरची भूमिका पार पाडले. भारताची संभाव्य टीम रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल न्यूझीलंडची संभाव्य टीम मार्टिन गप्टिल, डॅरेल मिचेल, ग्लेन फिलिप्स, टीम सायफर्ट, मार्क चॅपमॅन, जिमी नीशम, टीम साउदी (कर्णधार), मिचेल सॅन्टनर, ईश सोढी, लॉकी फर्ग्यूसन, एडम मिल्ने
  Published by:Shreyas
  First published: