मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ 1st T20 : कर्णधार बदलताच भुवीचं लक बदललं, मॅचच्या तिसऱ्या बॉललाच दाखवलं मॅजिक

IND vs NZ 1st T20 : कर्णधार बदलताच भुवीचं लक बदललं, मॅचच्या तिसऱ्या बॉललाच दाखवलं मॅजिक

PHOTO-BCCI

PHOTO-BCCI

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या पहिल्या टी-20 (India vs New Zealand 1st T20) मधून टीम इंडियाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. विराट कोहलीकडून (Virat Kohli) रोहित शर्माकडे (Rohit Sharma) टीम इंडियाचं नेतृत्व आल्यानंतर लगेचच भुवनेश्वर कुमारचं (Bhuvneshwar Kumar) नशीब बदललं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

जयपूर, 17 नोव्हेंबर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या पहिल्या टी-20 (India vs New Zealand 1st T20) मधून टीम इंडियाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. रोहित शर्माची (Rohit Sharma) टी-20 टीमचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून निवड झाली आहे, तर राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या आधीच विराट कोहलीने (Virat Kohli) आपण या फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडणार असल्याचं सांगितलं होतं. यानंतर विराटला न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी-20 सीरिजसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

विराट कोहलीकडून रोहित शर्माकडे टीम इंडियाचं नेतृत्व आल्यानंतर लगेचच भुवनेश्वर कुमारचं (Bhuvneshwar Kumar) नशीब बदललं आहे. मॅचच्या तिसऱ्या बॉललाच भुवनेश्वर कुमारने धोकादायक डॅरेल मिचेलला बोल्ड केलं. याआधी आयपीएल आणि टी-20 वर्ल्ड कपमध्ये भुवनेश्वर कुमारला संघर्ष करावा लागला. खराब कामगिरीमुळे भुवनेश्वर कुमारला टी-20 वर्ल्ड कपमध्ये सुरुवातीच्या सामन्यानंतरच टीममधून डच्चू देण्यात आला. एवढच नाही तर त्याच्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी झालेल्या निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं, पण भुवीने पहिल्याच ओव्हरमध्ये स्वत:ची निवड योग्य ठरवली.

इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सेमी फायनलमध्ये नाबाद 72 रन करून न्यूझीलंडला फायनलमध्ये पोहोचवणारा डॅरेल मिचेल भारताविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला. मिचेलने वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये 47 बॉलमध्ये नाबाद 72 रनची इनिंग खेळत न्यूझीलंडला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. मिचेलच्या या खेळीमुळे न्यूझीलंडने टी-20 वर्ल्ड कपची सेमी फायनल गाठली, पण फायनलमध्ये त्यांचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाला.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. आयपीएलमध्ये धमाका करणाऱ्या ऑलराऊंडर व्यंकटेश अय्यरने या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. याशिवाय श्रेयस अय्यर आणि दीपक चहरनेही टीममध्ये पुनरागमन केलं आहे.

यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक झाली. सुपर-12 मध्येच भारताचं आव्हान संपुष्टात आलं. यानंतर आता ऑस्ट्रेलियात होणारा पुढचा टी-20 वर्ल्ड कप अवघ्या 11 महिन्यांवर आला आहे, त्यामुळे रोहित शर्मा आणि राहुल द्रविड या नव्या जोडीला नव्याने टीम बांधणी करावी लागणार आहे.

First published:

Tags: Team india