IND vs NZ: भारत-न्यूझीलंडमध्ये आज होणार कॉंटे की टक्कर! ‘या’ खेळाडूंना विराट देणार संघात जागा

IND vs NZ: भारत-न्यूझीलंडमध्ये आज होणार कॉंटे की टक्कर! ‘या’ खेळाडूंना विराट देणार संघात जागा

न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे.

  • Share this:

ऑकलंड, 24 जानेवारी : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी -20 आंतरराष्ट्रीय मालिकेचा पहिला सामना आज ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यात धावांचा पाऊस पाहायला मिळू शकतो. टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ईडन पार्क मोठ्या धावसंख्येसाठी ओळखला जातो.

आतापर्यंत या मैदानावर 19 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये पाच वेळा 200 पेक्षा जास्त वेळा स्कोअर झाला आहे. या खेरीज दोन्ही खेळींमध्ये फलंदाजीसाठीही या खेळपट्ट्या चांगली आहेत. दरम्यान भारतानं याआधी दक्षिण आफ्रिकाविरुद्ध वगळता सर्व टी-20 मालिका जिंकल्या आहेत. मात्र भारतासाठी ही मालिका जिंकणे कठिण असणार आहे. सध्या भारतीय संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे, असे असले तरी शिखर धवन जखमी असल्यामुळं सलामीला रोहित-विराटची जोडी उतरेल. त्यानंतर विराट तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो.

विराटसमोर मुख्य प्रश्न असणार आहे तो, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर कोणाला फलंदाजीस उतरवणारा. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यर आणि मनीष पांडे यांनी चांगली कामगिरी केली होती. त्यामुळं त्यांनाच या जागी फलंदाजीची संधी मिळेल. तर, गोलंदाजीमधअये जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी आणि कुलदीप किंवा चहल यांच्यापैकी एकाला संधी मिळेल. दरम्यान सामन्याआधी विराटनं संघात बदल केले जाणार नाहीत, असे संकेत दिले होते.

भारतीय संघात कोणतेही बदल होणार नाहीत

दरम्यान न्यूझीलंड दौऱ्यामध्ये भारतीय संघात विशेष चांगले बदल केले जाणार नाहीत, असे संकेतही विराटने यावेळी दिले. तसेच, या मालिकेपूर्वी विराटने पुन्हा एकदा केएल राहुलची जोरदार प्रशंसा केली आणि टीम मॅन म्हणून वर्णन केले. कोहली म्हणाला, 'राहुल देखील विकेटच्या मागे चांगले काम करत आहे आणि सामन्यात कोणत्याही परिस्थितीसाठी तो सज्ज आहे. त्याच्या संघात असल्याने आम्हाला अतिरिक्त फलंदाजासह उतरण्याची संधी मिळते. तो कोणत्याही प्रकारची भूमिका करण्यास तयार आहे. तो पूर्ण टीम मॅन आहे”, त्यामुळं श्रीलंकेविरुद्ध जो भारतीय संघ होता तोच आता पुन्हा न्यूझीलंडविरुद्ध दिसू शकतो.

हेड टू हेड

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकूण 11 टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारताने तीन आणि न्यूझीलंडने आठ जिंकले आहेत. न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांविषयी बोलताना, येथे दोन्ही संघांमध्ये एकूण पाच सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारताने एक जिंकला आहे तर न्यूझीलंडने चार जिंकले आहेत. ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानाविषयी बोलताना, दोन्ही संघांमधील एकमेव टी -20 आंतरराष्ट्रीय सामना येथे जिंकला गेला, जो भारताने जिंकला.

भारताचा संभाव्य संघ- विराट कोहली ( कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, कुलदीप यादव/युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर.

टी-20 मालिका-

24 जानेवारी- पहिला टी20 सामना

26 जानेवारी- दुसरा टी20 सामना

29 जानेवारी-तिसरा टी20 सामना

31 जानेवारी-चौथा टी20 सामना

2 फेब्रुवारी-पाचवा टी20 सामना

First published: January 24, 2020, 7:13 AM IST

ताज्या बातम्या