Home /News /sport /

VIDEO : अरे देवा! बुमराहशी बोलण्यासाठी खेळाडूंना द्यावे लागतात 50 लाख?

VIDEO : अरे देवा! बुमराहशी बोलण्यासाठी खेळाडूंना द्यावे लागतात 50 लाख?

सेमीफायनलमध्ये भारताच्या गोलंदाजीची धुरा ही वेगवान गोलंदाज जस्रपीत बुमराह याच्या खांद्यावर असणार आहे. बुमराहनं वर्ल्ड कपमध्ये 17 विकेट घेतल्या आहेत.

सेमीफायनलमध्ये भारताच्या गोलंदाजीची धुरा ही वेगवान गोलंदाज जस्रपीत बुमराह याच्या खांद्यावर असणार आहे. बुमराहनं वर्ल्ड कपमध्ये 17 विकेट घेतल्या आहेत.

युजवेंद्र चहलनं प्रसिद्ध अशा चहल टिव्हीच्या माध्यमातून बुमराहशी संवाद साधताना हे गुपित सांगितले.

    हॅमिल्टन, 28 जानेवारी : भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर शानदार प्रदर्शन करत आहेत. पाच टी-20 सामन्यातील तिसरा सामना हॅमिल्टन येथे 29 जानेवारीला खेळला जाईल. या मालिकेच्या पहिल्या टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने न्यूझीलंडला 6 गडी राखून पराभूत केले. यानंतर भारताने दुसरा टी -20 सामना 7 गडी राखून जिंकला आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी -20 मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. त्यामुळं तिसरा सामना जिंकत ही मालिका खिशात घालण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. हॅमिल्टनमध्ये होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ तेथे पोहचला आहे. यावेळी युजवेंद्र चहलनं प्रसिद्ध अशा चहल टिव्हीच्या माध्यमातून खेळाडूंची संवाद साधला. चहलने केएल राहुल, ऋषभ पंत, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह यांच्याशी संवाद साधला. वाचा-टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ निश्चित! 'या' 11 खेळाडूंची जागा पक्की युजवेंद्र चहलने प्रथम भारताचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याशी बोलले. युजवेंद्र चहलने विनोदात बुमराहशी केवळ बोलण्यासाठी पैसे मोजावे लागतात असे सांगितले. बुमराहशी बोलण्यासाठी त्याने आपल्या मॅनेजरला 50 लाख रुपये दिले असल्याचे त्यांनी सांगितले. चहलच्या बोलण्यावर बुमराह हसला. तो म्हणाला, 'मी प्रथमच न्यूझीलंडला आलो आहे आणि मी येथे आनंद घेत आहे. आतापर्यंत ते खूप चांगले झाले आहे. यानंतर चहलने बुमराहला विचारले की तू माझ्याबरोबर जेवायला का जात नाहीस? यावर बुमराह म्हणाले की तुम्ही कॉल केल्यास मी नक्की येईन. बुमराह दुखापतीतून सावरत सध्या दोन महिन्यांनंतर क्रिकेट खेळत आहे. वाचा-कॅप्टन कुल धोनीचा हटके अंदाज, साक्षीसोबत केला रोमॅंटिक डान्स! VIDEO VIRAL वाचा-भारताविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्याआधी किवींना झटका, गोलंदाजाने घेतली निवृती चहलनं काढली धोनीची आठवण बीसीसीआय टिव्हीने एक व्हिडीओ पोस्ट करत धोनीची आठवण काढली. टीम इंडियाच्या बसमध्ये सर्वात मागच्या सीटवर जाऊन चहलनं आजही ही जागा धोनीसाठी आम्ही राखीव ठेवली आहे असे सांगत माही भाईची आठवण येत असल्याचे सांगितले. धोनी वर्ल्ड कप 2019नंतर टीम इंडियाच्या बाहेर आहे. त्यानं एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. मात्र आता धोनीला भारतीय संघात संधी मिळेल की नाही, याबाबत शंका आहे. तरी, धोनीला ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये संधी मिळू शकते.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या