मांजरेकर आणि जडेजा यांच्यात पुन्हा जुंपली, केएल राहुल ठरला कारण

मांजरेकर आणि जडेजा यांच्यात पुन्हा जुंपली, केएल राहुल ठरला कारण

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात नाबाद अर्धशतकी खेळी करणाऱ्या केएल राहुलला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 जानेवारी : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडला दुसऱ्या टी20 सामन्यात विजय मिळवून मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. सलग दुसरं अर्धशतक साजरं करणाऱ्या केएल राहुलला सामनावीरचा पुरस्कार मिळाला. त्याला सामनावीर पुरस्कार दिल्यानं अनेक दिग्गजांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. अजय डेजा आणि विरेंद्र सेहवाग यांनी हा पुरस्कार एखाद्या गोलंदाजाला मिळावा असं म्हटलं होतं. कारण प्रतिस्पर्धी संघाला 132 धावांत रोखण्याची कामगिरी गोलंदाजांनी केली होती. आता यावर संजय मांजरेकर यांनीही मत व्यक्त केलं आहे. यामुळे आता पुन्हा जडेजा विरुद्ध मांजरेकर असा सामना ट्विटरवर बघायला मिळत आहे.

संजय मांजरेकर यांनी सामन्यानंतर ट्विट केलं होतं की, हा पुरस्कार एखाद्या गोलंदाजाला मिळायला हवा. त्यावर जडेजाने फिरकी घेत गोलंदाजाचं नाव काय असं विचारलं. जडेजाच्या प्रश्नावर हसतच मांजरेकरांनी म्हटलं की, हा पुरस्कार तर तुलाच मिळायला पाहिजे किंवा बुमराहला. कारण त्याने 3, 10, 18 आणि 20 वे षटक टाकले. त्याने टिच्चून मारा केला.

सामनावीर पुरस्कार फलंदाजाला दिल्यानंतर तो गोलंदाजाला देण्याची चर्चा होत आहे. भारताने 15 चेंडू आणि 7 गडी राखून सामना जिंकला होता. केएल राहुलने नाबाद 57 धावा केल्या. मात्र या सामन्यात जडेजाला सामनावीर पुरस्कार मिळायला पाहिजे होता अशी चर्चा होत आहे.

ऑकलंडमध्ये झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात जडेजाने 4 षटकात 18 धावा देत दोन गडी बाद केले. यामध्ये त्याने 4.50 च्या धावगतीने धावा दिल्या. तसेच त्याने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन आणि अष्टपैलू कॉलिन डी ग्रँडहोमला बाद केलं. जडेजाशिवाय जसप्रीत बुमराहनेसुद्धा जबरदस्त गोलंदाजी केली. बुमराहने 4 षटकात फक्त 21 धावा देत एक गडी बाद केला.

अनुष्का-विराटच्या कमाईत तीनपट वाढ, दोघं मिळून विकत घेऊ शकतात अनेक देश

First published: January 27, 2020, 6:30 PM IST

ताज्या बातम्या