मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ : मालिका जिंकली पण टी-20 वर्ल्ड कप धोक्यातच! विराटला करावे लागतील 3 बदल

IND vs NZ : मालिका जिंकली पण टी-20 वर्ल्ड कप धोक्यातच! विराटला करावे लागतील 3 बदल

फक्त कोहलीच नाही तर हे तीन खेळाडूही तणावामुळं लवकरच निवृत्ती जाहीर करू शकतात. सततच्या क्रिकेटमुळे गेले काही महिने भारताचे फॉर्ममध्ये असलेले खेळाडू दुखापतीमुळं संघाबाहेर आहेत. यात रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह हे खेळाडू सततच्या क्रिकेटमुळं विराटप्रमाणे एका फॉर्मेटमधून निवृत्ती घेऊ शकतात.

फक्त कोहलीच नाही तर हे तीन खेळाडूही तणावामुळं लवकरच निवृत्ती जाहीर करू शकतात. सततच्या क्रिकेटमुळे गेले काही महिने भारताचे फॉर्ममध्ये असलेले खेळाडू दुखापतीमुळं संघाबाहेर आहेत. यात रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह हे खेळाडू सततच्या क्रिकेटमुळं विराटप्रमाणे एका फॉर्मेटमधून निवृत्ती घेऊ शकतात.

न्यूझीलंडला त्यांच्यात भुमीत नमवल्यानंतर आज भारत-न्यूझीलंड यांच्यात चौथा टी-20 सामना होणार आहे.

  • Published by:  Priyanka Gawde

वेलिंग्टन, 31 जानेवारी : न्यूझीलंडला त्यांच्यात भुमीत नमवल्यानंतर आज भारत-न्यूझीलंड यांच्यात चौथा टी-20 सामना होणार आहे. पाच सामन्यांची मालिका भारतानं 3-0ने जिंकली आहे. त्यामुळं उर्वरित दोन सामन्यांमध्ये टीम इंडिया संघात महत्त्वपूर्ण बदल करू शकतात. भारतानं ही मालिका जिंकली असली तरी अजूनही काही क्षेत्रांमध्ये विराटसेना कमकुवत आहे. त्यामुळं भारताला वेलिंग्टनमध्ये होणाऱ्या चौथ्या टी-20 सामन्यात महत्त्वपूर्ण बदल करावे लागतील.

गोलंदाजीमध्ये सुधाराची गरज

दुसरा टी-20 सामना वगळता भारतीय संघानं इतर दोन सामन्यात चांगली गोलंदाजी केली नाही. पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं 203 धावा न्यूझीलंडला दिल्या. तर तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडला दिलेले 179 धावांचे आव्हान टीम इंडिया रोखू शकली नाही. त्यामुळं सामना सुपरओव्हरपर्यंत गेला. सध्या भारतीय संघ हा फलंदाजांवर जास्त अवलंबून आहे. गोलंदाजाच्या खेळीवर लक्ष दिल्यास रवींद्र जडेजाशिवाय एकाही गोलंदाजाला चांगली कामगिरी करता आलेली नाही. शार्दुल ठाकुरचा इकॉनमी रेट 10.75 आहे तर शिवम दुबेचा इकॉनमी रेट 9 रन प्रती ओव्हर आहे. बुमराहनेही (Jasprit Bumrah) 8 रन प्रती ओव्हरने या मालिकेत धावा दिल्या आहेत. त्यामुळे भारताला गोलंदाजीमध्ये सुधार करण्याशिवाय पर्याय नाही आहे. त्यामुळं आजच्या सामन्यात नवदीप सैनीला संधी मिळू शकते.

वाचा-सनी लिओनीला क्रिकेट नाही तर 'या' खास कारणासाठी आवडतो कॅप्टनकुल धोनी

टीम इंडियाची खराब फील्डिंग

तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाची खराब क्षेत्ररक्षण दिसेल. खराब क्षेत्ररक्षणामुळे भारतानं न्यूझीलंडला 22 धावा दिल्या. यात टीम इंडियाने 3 कॅच सोडले. विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी दुसऱ्या टी-20 सामन्यात सोप्या कॅच सोडल्या. त्यामुळं भारताला क्षेत्ररक्षणात महत्त्वपूर्ण बदल करावे लागतील.

वाचा-…तर रोहित सुपर ओव्हरसाठी मैदानात उतरलाच नसता, ती 5 मिनिटं विराट नाही विसरणार!

विराट कोहली फॉर्ममध्ये नाही

टीम इंडियाने तीन टी -20 सामने जिंकले आहेत पण भारतीय कर्णधार विराट कोहलीची बॅट शांत आहे. विराट कोहलीने या मालिकेत फक्त 31.33 च्या सरासरीने 94 धावा केल्या आहेत. विश्व क्रिकेटमध्ये विराटच्या कलेनुसार ही अत्यंत सरासरी कामगिरी आहे. हॅमिल्टनमध्ये टीम इंडिया एकेकाळी 10च्या रनरेटने धावा केल्या. मात्र केएल राहुल बाद झाल्यानंतर भारत केवळ 179 धावांवर पोहोचू शकला, तर एका वेळी त्याची धावसंख्या 200 च्या पुढे गेली असती.

First published:

Tags: Cricket