Home /News /sport /

IND vs NZ : तिसऱ्या सामन्याचा विलन होणार न्यूझीलंडचा कर्णधार! केन विल्यमसन बाहेर

IND vs NZ : तिसऱ्या सामन्याचा विलन होणार न्यूझीलंडचा कर्णधार! केन विल्यमसन बाहेर

न्यूझीलंडला त्यांच्यात भुमीत नमवल्यानंतर आज भारत-न्यूझीलंड यांच्यात चौथा टी-20 सामना होणार आहे. पाच सामन्यांची मालिका भारतानं 3-0ने जिंकली आहे.

    वेलिंग्टन, 31 जानेवारी : न्यूझीलंडला त्यांच्यात भुमीत नमवल्यानंतर आज भारत-न्यूझीलंड यांच्यात चौथा टी-20 सामना होणार आहे. पाच सामन्यांची मालिका भारतानं 3-0ने जिंकली आहे. त्यामुळे हा सामना न्यूझीलंडला क्लिन स्वीप वाचवण्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. मात्र त्याआधीच न्यूझीलंड संघाला मोठा झटका बसला आहे. तिसऱ्या सामन्यात 95 धावांची खेळी करणारा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन चौथा सामना खेळणार नाही आहे. त्यामुळं टीम साऊथीकडे न्यूझीलंडचे कर्णधारपद असेल. तिसऱ्या सामन्यादरम्यान केन विल्यमसनच्या डाव्या खांद्याला झाली होती. त्यामुळं त्याला हा सामना खेळता येणार नाही आहे. तिसऱ्या सामन्यात केन विल्यमसनने महत्त्वपूर्ण अशी 95 धावांची खेळी केली होती. दरम्यान केन दुखापतीमुळे बाहेर पडल्याचा फटका संघाला बसू शकतो. याआधी पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यातही केनने चांगली फलंदाजी केली होती. तर तिसऱ्या सामन्यात झालेल्या सुपरओव्हरमध्ये टीम साऊदीनं निराशाजनक कामगिरी केली होती. भारतीय संघात होऊ शकतात बदल दोन्ही संघातील चौथा सामना वेलिंग्टन येथील वेस्टपॅक मैदानावर होत होणार आहे. तिसऱ्या सामन्यानंतर विराटने देखील बदलाचे संकेत दिले होते. त्यामुळे भारतीय संघात नव्या खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे. यात नवदीप सैनी आणि अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर यांना संधी मिळू शकते. भारतीय संघातील सलामीवीरांचा विचार केल्यास चौथ्या सामन्यात रोहित शर्मा आणि केएल राहुल हेच डावाची सुरूवात करतील. राहुलने फलंदाज आणि विकेटकीपर म्हणून देखील छाप पाडली आहे. मधल्या फळीचा विचार केल्यास कर्णधार विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि मनीष पांडे हेच असतील.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या