मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

सुपर ओव्हमध्ये विराटचा विजयी चौकार, न्यूझीलंडचा पुन्हा पराभव

सुपर ओव्हमध्ये विराटचा विजयी चौकार, न्यूझीलंडचा पुन्हा पराभव

रोहित शर्मा, जडेजा आणि मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे. तर त्या जागी संजू सॅमसन, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संघात जागा देण्यात आली आहे.

रोहित शर्मा, जडेजा आणि मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे. तर त्या जागी संजू सॅमसन, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संघात जागा देण्यात आली आहे.

रोहित शर्मा, जडेजा आणि मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे. तर त्या जागी संजू सॅमसन, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संघात जागा देण्यात आली आहे.

  • Published by:  Priyanka Gawde

वेलिंग्टन, 31 जानेवारी :  भारत न्यूझीलंड चौथ्या सामन्यातही सुपर ओव्हरचा थरार रंगला. सुपर ओव्हरमध्ये भारताने पुन्हा बाजी मारत न्यूझीलंडवर विजय मिळवला. भारताने दिलेल्या 165 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड 165 धावा करू शकला. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 13 धावा केल्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या केएल राहुलने पहिल्या दोन चेंडूत षटकार आणि चौकार मारला. तिसऱ्या चेंडूवर फटका मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला. त्यानंतर विराटने चौथ्या चेंडूवर दोन आणि पाचव्या चेंडूवर चौकार मारून विजय मिळवला. यासह मालिकेत 4-0 ने आघाडी घेतली.

भारत-न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सुपर ओव्हरमध्ये भारताने जसप्रीत बुमराहच्या हाती चेंडू दिला. पहिल्या चेंडूवर सेफर्टने एक धावा काढली, यावेळी श्रेयस अय्यरनं कॅच सोडला. तर दुसऱ्या चेंडूवर सेफर्टने चौकार मारला. तिसऱ्या चेंडूवर बुमराहच्या शॉट बॉलवर सेफर्टला बाद करण्याची संधी होती. मात्र केएल राहुलनं हा कॅच सोडला. चौथा चेंडूवर वॉशिग्टन सुंदरने सीमारेषेवर चांगला कॅच घेतला. पाचव्या चेंडूवर रॉस टेलरने चौकर मारला. सहाव्या चेंडूवर एक धाव घेतली. त्यामुळं भारताला 14 धावांचे आव्हान दिले होते.

त्याआधी तिसऱ्या सामन्यासारखाच हा सामनाही शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. अखेरच्या षटकात विजयासाठी 7 धावा हव्या असताना भारताचा गोलंदाज शार्दुल ठाकुरने रॉस टेलरला पहिल्याच चेंडूवर झेलबादग केलं. त्यानंतर टिम सैफर्टनं चौकार मारला. त्याच्या पुढच्याच चेंडूवर चोरटी धाव घेणं टिम सेफर्टला महागात पडलं आणि तो धावबाद झाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या मिशेल सँटनरने एक धाव घेतली. त्यानंतर पाचव्या चेंडूवर मिशेल झेलबाद झाला. तर सहाव्या चेंडूवर एकच धाव करता आली.

तत्पूर्वी, भारत-न्यूझीलंड यांच्यात वेलिंग्टन येथील चौथ्या सामन्यात भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी सुमार कामगिरी केली. मात्र मनिष पांडेच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने 20 ओव्हरमध्ये 165 धावा केल्या. न्यूझीलंडला हा सामना जिंकण्यासाठी 166 धावांची गरज आहे. मनिष पांडेने 36 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. तर, सलामीवीर केएल राहुलच्या 39 धावा वगळता एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.

न्यूझीलंडने प्रथम टॉस जिंकत या सामन्यात गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान भारतानं या सामन्यात रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी यांना विश्रांती देत संजू सॅमसन, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संघात जागा दिली. रोहितच्या जागी सलामीला उतरलेल्या संजूने एक षटकार खेचत आपल्या खेळीची सुरुवात केली. मात्र त्यानंतर 8 धावा करत मनीष बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या कॅप्टन कोहलीला विशेष चांगली फलंदाजी करता आली नाही. कोहली 11 धावांवर बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर 1, शिवम दुबे 12 आणि वॉशिंग्टन सुंदर शुन्यावर बाद झाला.

अखेर मनिष पांडे आणि शार्दुल ठाकूर यांनी महत्त्वपूर्ण अशी 40 धावांची भागीदारी केली. या दोघांच्या आक्रमक खेळीने भारताचा डाव सावरला. न्यूझीलंडकडून इश सोढीने 3, हॅमिश बेनेटने 2 तर स्कॉट कुगेलेइन, टीम साऊदी आणि मिशेल सँटनर यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या.

पहिले तीनही सामने जिंकल्यामुळं भारतीय संघाचा आत्मविश्वास चांगला आहे. असे असले तरी, भारताला क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे. तर, दुसरीकडे सामन्याआधीच न्यूझीलंडला मोठा झटका बसला आहे. फॉर्ममध्ये असलेला कर्णधार केन विल्यमसन दुखापतीमुळे आजचा सामना खेळू शकणार नाही आहे. त्यामुळं टीम साऊथीकडे संघाचे नेतृत्व आहे.

गोलंदाजीमध्ये सुधाराची गरज

दुसरा टी-20 सामना वगळता भारतीय संघानं इतर दोन सामन्यात चांगली गोलंदाजी केली नाही. पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं 203 धावा न्यूझीलंडला दिल्या. तर तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडला दिलेले 179 धावांचे आव्हान टीम इंडिया रोखू शकली नाही. त्यामुळं सामना सुपरओव्हरपर्यंत गेला. सध्या भारतीय संघ हा फलंदाजांवर जास्त अवलंबून आहे. गोलंदाजाच्या खेळीवर लक्ष दिल्यास रवींद्र जडेजाशिवाय एकाही गोलंदाजाला चांगली कामगिरी करता आलेली नाही. शार्दुल ठाकुरचा इकॉनमी रेट 10.75 आहे तर शिवम दुबेचा इकॉनमी रेट 9 रन प्रती ओव्हर आहे. बुमराहनेही (Jasprit Bumrah) 8 रन प्रती ओव्हरने या मालिकेत धावा दिल्या आहेत. त्यामुळे भारताला गोलंदाजीमध्ये सुधार करण्याशिवाय पर्याय नाही आहे.

टीम इंडियाला क्षेत्ररक्षणात करावा लागेल सुधार

तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाची खराब क्षेत्ररक्षण दिसेल. खराब क्षेत्ररक्षणामुळे भारतानं न्यूझीलंडला 22 धावा दिल्या. यात टीम इंडियाने 3 कॅच सोडले. विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी दुसऱ्या टी-20 सामन्यात सोप्या कॅच सोडल्या. त्यामुळं भारताला क्षेत्ररक्षणात महत्त्वपूर्ण बदल करावे लागतील.

भारत : विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल (यष्टिरक्षक), मनीष पांडे, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, यजुर्वेद्र चहल, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर.

न्यूझीलंड : मार्टिन गप्टिल, रॉस टेलर, स्कॉट कुगेलेइन, कॉलिन मुन्रो, कॉलिन डी ग्रँडहोम, टॉम ब्रूस, डॅरेल मिचेल, मिशेल सँटनर, टिम सेफर्ट (यष्टिरक्षक), हॅमिश बेनेट, ईश सोधी, टिम साऊदी (कर्णधार), ब्लेअर टिकनर.

First published: