या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवत न्यूझीलंडच्या भूमीवर प्रथमच टी -20 आंतरराष्ट्रीय मालिका जिंकेल. भारताने आतापर्यंत एकही मालिका न्यूझीलंडमध्ये जिंकलेली नाही. त्यामुळे या सामन्यात विजयासह विराटसेना एक इतिहास रचेल. वाचा-भारताविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्याआधी किवींना झटका, गोलंदाजाने घेतली निवृती भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या सुरू असलेल्या टी -20 मालिकेपूर्वी फक्त दोन टी -20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळल्या गेल्या आहेत. या दोन्ही टी -20 मालिकेत न्यूझीलंडकडून भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. 2008-2009मध्ये एक टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळली गेली होती. या दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारताला 0-2ने पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर, 2018-2019 मध्ये खेळल्या गेलेल्या टी -20 आंतरराष्ट्रीय मालिकेत न्यूझीलंडकडून भारताचा 2-1 असा पराभव झाला. वाचा-माहीची ‘ती’ जागा अजूनही रिकामी! धोनीच्या आठवणीत भावुक झाला चहलWhat's with #TeamIndia's new training drill? #NZvIND pic.twitter.com/HXuGXQjg4O
— BCCI (@BCCI) January 28, 2020
वाचा-कॅप्टन कुल धोनीचा हटके अंदाज, साक्षीसोबत केला रोमॅंटिक डान्स! VIDEO VIRAL असा आहे भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल (विकेटकीपर), मनीष पांडे, ऋषभ पंत, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकुर, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर. असा आहे न्यूजीलंडचा संघ: केन विल्यम्सन (कर्णधार), मार्टिन गुप्टिल, रॉस टेलर, स्कॉट कुगलेइजन, कॉलिन मुनरो, कॉलिन डी ग्रॅंडहोम, टॉम ब्रूस, डेरिल मिशेल, मिशेल सेंटनर, टिम सीफर्ट (विकेटकीपर), हैमिश बेनेट, ईश सोढ़ी, टिम साउथी, ब्लेयर टिकनर.Snapshots from #TeamIndia's training session ahead of the 3rd T20I against New Zealand.#NZvIND pic.twitter.com/KHKvrjt2H3
— BCCI (@BCCI) January 28, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket