...आणि रोहितने 'मराठमोळ्या’ स्टाईलमध्ये सांगितले सुपर ओव्हरचं सिक्रेट! VIDEO VIRAL

...आणि रोहितने 'मराठमोळ्या’ स्टाईलमध्ये सांगितले सुपर ओव्हरचं सिक्रेट! VIDEO VIRAL

पाच सामन्यांची टी-20 मालिका भारतानं 3-0ने जिंकली. पहिल्यांदाच न्यूझीलंडच्या भुमीवर भारताला न्यूझीलंडविरुद्ध मालिका विजय मिळवता आला आहे.

  • Share this:

हॅमिल्टन, 30 जानेवारी : न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील तिसरा टी20 सामना सुपर ओव्हरमध्येही अखेरच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक झाला. शेवटच्या चेंडूवर चार धावा हव्या असताना रोहित शर्माने सलग 2 षटकार खेचून भारताला विजय मिळवून दिला. याचबरोबर पाच सामन्यांची टी-20 मालिका भारतानं 3-0ने जिंकली. पहिल्यांदाच न्यूझीलंडच्या भुमीवर भारताला न्यूझीलंडविरुद्ध मालिका विजय मिळवता आला आहे. याआधी पहिल्या दोन टी-20 सामन्यात भारतानं एकहाती विजय मिळवला होता.

सुपर ओव्हरमध्ये भारताच्या जसप्रीत बुमराहने गोलंदाजी करताना 17 धावा दिल्या. त्यानंतर न्यूझीलंडकडून टीम साउथीने गोलंदाजी केली. न्यूझीलंडने एका षटकात 18 धावांचे आव्हान भारताला दिले. भारताकडून रोहित शर्मा आणि केएल राहुल फलंदाजीला आले होते. न्यूझीलंडचा गोलंदाज टीम साउथीने गोलंदाजी केली. रोहित शर्माने पहिल्या चेंडूवर दोन धावा काढल्या आणि दुसऱ्या चेंडूवर फक्त एकच धाव काढता आली. त्यानंतर केएल राहुलने तिसऱ्या चेंडूवर चौकार खेचला. त्यावेळी भारताला तीन चेंडूत 11 धावांची गरज होती. चौथ्या चेंडूवर केएल राहुलने एक धाव काढली. पाचव्या चेंडूवर रोहितने षटकार मारल्यानंतर भारताला अखेरच्या चेंडूवर चार धावांची गरज होती. रोहित शर्माने षटकार मारून विजय मिळवून दिला.

वाचा-असा रंगला सुपर ओव्हरचा थरार, रोहित शर्माने 2 चेंडूत फिरवला सामना

सामन्यानंतर रोहित शर्मानं पत्रकारांशी बोलताना पत्रकार सुनंदन लेले यांनी रोहितला मराठीत प्रश्न विचारला, त्यावर रोहितनं मराठमोळ्या स्टाईलनं उत्तर दिले. 40 चेंडूत 65 धावा करणाऱ्या रोहितला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला त्यानंतर रोहितला 'सुपर ओव्हरमध्ये आव्हानाचा पाठलाग करत असताना गोलंदाज जास्त दबावात असतो. फलंदाजीसाठी गेल्यावर खेळपट्टीवर उभा असताना मनात काय विचार असतात. असा प्रश्न विचारला. यावर रोहितनं मराठमोळ्या पद्धतीने, फलंदाजाने चूक केली तरी मी खेळपट्टीवर स्थिर राहणार असं ठरवलं होतं. त्यामुळं प्रत्येक चेंडूवर आक्रमक खेळण्याचा मी प्रयत्न केला’, असे सांगितले.

वाचा-विल्यम्सनच्या एका निर्णयामुळे सुपर ओव्हरआधीच नक्की झाला होता भारताचा विजय

वाचा-तिसऱ्या टी-20मध्ये सुपर ओव्हरचा थरार, सलग 2 षटकार खेचत हिटमॅनने मिळवून दिला विजय

केन विल्यमसनच्या खेळीचे केले कौतुक

सामन्यानंतर रोहित शर्माने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यांच्या 95 धावांच्या खेळीचे कौतुक केले. रोहितनं, “केन विल्यमसनने जबरदस्त खेळी केली, तरी न्यूझीलंडचा पराभव झाला, त्यामुळे त्यांना वाईट वाटलंच असेल. आम्ही मॅचमध्ये पुनरागमन केलं. मोहम्मद शमीची शेवटची ओव्हर आमच्यासाठी भरपूर महत्त्वाची होती. असा सामना वर्ल्ड कपमध्येही येऊ शकतो. तुम्हाला सकारात्मक राहावं लागेल,' असे रोहितने यावेळी सांगितले.

First published: January 30, 2020, 8:48 AM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या