याआधी थरारक सामन्यात मोहम्मद शमीने अखेरच्या षटकात दोन विकेट घेत न्यूझीलंडला धक्का दिला. शेवटच्या ओव्हरमध्ये 9 धावांची गरज असताना शमीने केवळ 8 धावा दिल्या. भारतानं दिलेल्या 180 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एकट्यानं 48 चेंडूत 95 धावा केल्या. केनने 197.92च्या स्ट्राईक रेटने 8 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीनं 95 धावा केल्या, केवळ 5 धावांची केनचे शतक हुकले. भारतानं दिलेल्या 180 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मार्टिन गुप्टिल आणि मुनरो यांनी 47 धावांची भागीदारी केली. त्यानंतर रवींद्र जडेजानं 6व्या ओव्हरमध्ये भारताला पहिले यश मिळवून दिले. मार्टिग गुप्टिल 31 धावांवर बाद झाल्यानंतर केन मैदानात आला. न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसनने आक्रमक फलंदाजी करत 28 चेंडुंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. केनने एकट्यानं न्यूझीलंडचा डाव सावरला. भारताकडून रवींद्र जडेजानं 2 विकेट घेत भारताच्या विजयासाठी प्रयत्न केला. थरारक सामन्यात मोहम्मद शमीने अखेरच्या षटकात दोन विकेट घेत न्यूझीलंडला धक्का दिला. तत्पूर्वी, न्यूझीलंडने प्रथम टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. हॅमिल्टनच्या मैदानावर केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी दणक्यात सुरुवात केली. चौकार आणि षटकारांच्या जोरावर राहुल आणि रोहित यांनी 89 धावांची भागिदारी केली. पहिल्या दोन सामन्यात अयशस्वी ठरलेल्या रोहित शर्मानं तिसऱ्या सामन्यात कसर पूर्ण केली. रोहितनं 40 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकार मारत 65 धावा केल्या. राहुल बाद झाल्यानंतर विराटने फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करत शिवम दुबेला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले. मात्र शिवमला चांगली कामगिरी करता आली नाही. दुबे केवळ 3 धावा करत बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर 17 धावा करत बाद झाला. पहिल्या दोन सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा अय्यर या सामन्यात लवकर बाद झाला. त्यानंतर विराट 38 धावांवर बाज झाल्यानंतर मनिष पांडेने 6 चेंडूत 14 धावा केल्या आणि भारताने 179 धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात 68 धावा करत रोहितनं सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजारा धावा पूर्ण केल्या. तर 24 धावा करत विराट टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा करणारा कर्णधार ठरला आहे. विराटनं धावा करत धोनीला मागे टाकले.India win!
— ICC (@ICC) January 29, 2020
Rohit Sharma hits the final two balls for six to win the game #NZvIND pic.twitter.com/CXFdI9chHl
असा आहे भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल (विकेटकीपर), मनीष पांडे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकुर. असा असेल न्यूजीलंडचा संघ: केन विल्यम्सन (कर्णधार), मार्टिन गुप्टिल, रॉस टेलर, स्कॉट कुगलेइजन, कॉलिन मुनरो, कॉलिन डी ग्रॅंडहोम, टॉम ब्रूस, डेरिल मिशेल, मिशेल सेंटनर, टिम सीफर्ट (विकेटकीपर), हैमिश बेनेट, ईश सोढ़ी, टिम साउथी, ब्लेयर टिकनर.Another day at office. Another record for #KingKohli 👑 pic.twitter.com/k9BmqtugWf
— BCCI (@BCCI) January 29, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs new Zealand