…तर रोहित सुपर ओव्हरसाठी मैदानात उतरलाच नसता, ती 5 मिनिटं विराट कधीच नाही विसरणार!

…तर रोहित सुपर ओव्हरसाठी मैदानात उतरलाच नसता, ती 5 मिनिटं विराट कधीच नाही विसरणार!

भारतीय संघाचा उप-कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) शानदार खेळीच्या जोरावर भारतानं न्यूझीलंडला सुपर ओव्हरमध्ये नमवले.

  • Share this:

हेमिल्टन, 30 जानेवारी : भारतीय संघाचा उप-कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) शानदार खेळीच्या जोरावर भारतानं न्यूझीलंडला सुपर ओव्हरमध्ये नमवले. या अटीतटीच्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर 4 धावा हव्या असताना रोहितनं जबरदस्त षटकार मारला आणि भारतानं हा सामना जिंकला. त्याचबरोबर पाच सामन्यांची मालिका 3-0ने खिशात घातली. भारत-न्यूझीलंड यांच्यात चौथा टी-20 सामना शुक्रवारी 31 जानेवारी रोजी खेळवला जाईल.

सुपर ओव्हरमच्याआधी रोहितनं फलंदाजी करताना 40 चेंडूत 65 धावांची आक्रमक खेळी केली होती. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये दोन षटकार लगावत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. मात्र सामन्यानंतर रोहितनं सुपर ओव्हरसाठी फलंदाजी करण्यासाठी तयारच नसल्याचा खुलासा केला होता. त्यावेळी कर्णधार विराट कोहलीही चिंतेत होता.

वाचा-VIDEO : ...आणि रोहितने 'मराठमोळ्या’ स्टाईलमध्ये सांगितले सुपर ओव्हरचं सिक्रेट!

सर्व सामना केले होते पॅक

रोहित शर्मानं सुपरओव्हरमध्ये फलंदाजी करण्याआधी पाच मिनिट त्याला फक्त एबडोमिनल गार्ड शोधायला लागले. त्यामुळं तो फलंदाजीसाठी उतरणार नव्हता. रोहितनं, “माझे सगळे सामान बॅगमध्ये होते. त्यामुळं सुपर ओव्हरमध्ये मला पुन्हा सामान बाहेर काढावे लागले. त्यामुळं 5 मिनिटे मला एबडोमिनल गार्ड शोधण्यासाठी लागली. कारण मला आठवत नव्हते की मी ते कुठे ठवले आहे”, असे सांगितले. रोहित शर्माला अपेक्षा नव्हती की सामना सुपरओव्हरमध्ये जाईल. तसेच, रोहितने आपल्या जागी श्रेयसला पाठवण्याच्या विचारात होता, असेही सांगितले.

वाचा-सुपर ओव्हरमध्ये कोणाच्या चुकीमुळे घडला चमत्कार? रोहित शर्माने केला खुलासा

रोहितने केले केएल राहुलचे कौतुक

रोहित शर्माने, 'जेव्हा जेव्हा कोणाला संधी मिळाली तेव्हा त्याने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या मालिकेत शिखर धवननेही महत्त्वपूर्ण अर्धशतक झळकावले होते आणि केएल राहुल शेवटच्या सात-आठ टी -20 सामन्यांमधून चांगला फॉर्मात आहे. त्याने बहुधा चार किंवा पाच अर्धशतके ठोकली आहेत", असे सांगितले. तसेच, "संघासाठी त्याचा फॉर्म महत्त्वाचा आहे. हे महत्त्वाचे आहे की आपले बहुतेक खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये रहावेत आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण असेल याविषयी निर्णय सर्व खेळाडू उपलब्ध असतानाच घेण्यात येईल. कर्णधार आणि संघ व्यवस्थापन येथे बसून कोणत्या सामन्यात कोणत्या खेळाडूंनी खेळायचे हे ठरवतील”, असे सांगितले.

वाचा-विल्यम्सनच्या एका निर्णयामुळे सुपर ओव्हरआधीच नक्की झाला होता भारताचा विजय

केन विल्यमसनच्या खेळीचे केले कौतुक

सामन्यानंतर रोहित शर्माने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यांच्या 95 धावांच्या खेळीचे कौतुक केले. रोहितनं, “केन विल्यमसनने जबरदस्त खेळी केली, तरी न्यूझीलंडचा पराभव झाला, त्यामुळे त्यांना वाईट वाटलंच असेल. आम्ही मॅचमध्ये पुनरागमन केलं. मोहम्मद शमीची शेवटची ओव्हर आमच्यासाठी भरपूर महत्त्वाची होती. असा सामना वर्ल्ड कपमध्येही येऊ शकतो. तुम्हाला सकारात्मक राहावं लागेल,' असे रोहितने यावेळी सांगितले.

First published: January 30, 2020, 12:06 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या