Home /News /sport /

IND vs NZ : ‘आम्हाला बुमराहपासून वाचव’, न्यूझीलंडच्या खेळाडूंचे देवाला साकडे!

IND vs NZ : ‘आम्हाला बुमराहपासून वाचव’, न्यूझीलंडच्या खेळाडूंचे देवाला साकडे!

सेमीफायनलमध्ये भारताच्या गोलंदाजीची धुरा ही वेगवान गोलंदाज जस्रपीत बुमराह याच्या खांद्यावर असणार आहे. बुमराहनं वर्ल्ड कपमध्ये 17 विकेट घेतल्या आहेत.

सेमीफायनलमध्ये भारताच्या गोलंदाजीची धुरा ही वेगवान गोलंदाज जस्रपीत बुमराह याच्या खांद्यावर असणार आहे. बुमराहनं वर्ल्ड कपमध्ये 17 विकेट घेतल्या आहेत.

भारत-न्यूझीलंड यांच्यात आज तिसरा सामना खेळवण्यात येणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत पहिले दोन सामने जिंकत भारतानं 2-0ने या मालिकेत आघाडी घेतली आहे.

    हॅमिल्टन, 29 जानेवारी : भारत-न्यूझीलंड यांच्यात आज तिसरा सामना खेळवण्यात येणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत पहिले दोन सामने जिंकत भारतानं 2-0ने या मालिकेत आघाडी घेतली आहे. त्यामुळं आजच्या सामन्यात टीम इंडियाल मालिका विजयासाठी तर न्यूझीलंडचा संघ लाज राखण्यासाठी मैदानात उतरतील. भारतानं पहिले दोन्ही सामने एकहाती जिंकले आहेत, त्यामुळं तिसऱ्या सामन्यात भारताचे पारडे जड आहे. त्यामुळं सामन्याआधी न्यूझीलंडचे खेळाडू देवाकडे साकडे घालत आहेत. दरम्यान, न्यूझीलंडचा यष्टिरक्षक फलंदाज टिम सिफर्ट आणि सलामीवीर मार्टिन गुप्टिल यांनी जसप्रीत बुमराहचे जोरदार कौतुक केले आहे. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची गोलंदाजी समजणे कठीण आहे आणि टी -20 मालिकेत जर न्यूझीलंडचा पुनरागमन करायचे असेल तर त्यांना बुमराहचा सामना करावा लागला, असे सिफर्टने सांगितले. तर गुप्टिलने बुमराहला सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हटले. वाचा-आज टीम इंडिया रचणार इतिहास, पण पाऊस फिरवणार विराटसेनेच्या इराद्यांवर पाणी! भारताने ऑकलंड येथे रविवारी दुसर्‍या टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात न्यूझीलंडला सात गडी राखून पराभूत केले आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. बुमराहने चार षटकांत 21 धावा देऊन एक विकेट घेतली. त्यामुळं डेथ ओव्हरमध्ये बुमराह सारखा उत्कृष्ठ गोलंदाज भारताकडे नाही. त्याचबरोबर दोन्ही सामन्यात भारतीय फलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. वाचा-न्यूझीलंडमध्ये आणखी एक विजय आणि विराटसेना रचणार इतिहास! ‘बुमराहच्या गोलंदाजीपासून वाचवा’ सेफर्टने तिसऱ्या सामन्याआधी, “पहिल्या सामन्यातही बुमराहने स्लो बॉल टाकले. सहसा डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाज सरळ रेषेत गोलंदाजी करतो, यार्करही टाकतो. मात्र बुमराहने वेगळेच तंत्रज्ञान वापरले. त्यामुळं आम्हाला खेळणे कठिण झाले होते. बुमराहचा सामना करण्यासाठी आम्हाला सज्ज राहावे लागेल”, असे सांगितले. दुसऱ्या सामन्यात सेफर्टनं 26 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या होत्या. सेफर्टशिवाय संघाचा सलामीवीर मार्टिन गुप्टिलनेही बुमराहच्या चेंडूंना धोकादायक म्हटले आहे. बुमराहच्या यॉर्कर्स, बाउन्सर आणि स्लो बॉल्सला डेथ ओव्हर्समध्ये खेळणे अवघड आहे, असे गुप्टिल यांनी म्हटले आहे. त्याने बुमराहला डेथ ओव्हर्सचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे त्याच्या विरुद्ध खेळण्यासाठी आम्हाला वाचवा, असे साकडेही घातले. वाचा-अरे देवा! बुमराहशी बोलण्यासाठी खेळाडूंना द्यावे लागतात 50 लाख? असा असेल भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल (विकेटकीपर), मनीष पांडे, ऋषभ पंत, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकुर, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर. असा असेल न्यूजीलंडचा संघ: केन विल्यम्सन (कर्णधार), मार्टिन गुप्टिल, रॉस टेलर, स्कॉट कुगलेइजन, कॉलिन मुनरो, कॉलिन डी ग्रॅंडहोम, टॉम ब्रूस, डेरिल मिशेल, मिशेल सेंटनर, टिम सीफर्ट (विकेटकीपर), हैमिश बेनेट, ईश सोढ़ी, टिम साउथी, ब्लेयर टिकनर.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या