मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ 2nd Test Series मध्ये स्पाइडर-कॅमचा अडथळा, VIDEO व्हायरल

IND vs NZ 2nd Test Series मध्ये स्पाइडर-कॅमचा अडथळा, VIDEO व्हायरल

pider cam

pider cam

भारत-न्यूझीलंड कसोटीत (IND vs NZ 2nd Test Series ) तिसऱ्या दिवशी स्पाइडर-कॅमचा अडथळा आला. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

मुंबई, 5 डिसेंबर: मुंबई येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं(IND vs NZ 2nd Test Series ) दुसरा डाव 7 बाद 276 धावांवर घोषित करून 539 धावांची भक्कम आघाडी घेतली. भारताच्या पहिल्या डावातील ३२५ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव ६२ धावांवर गडगडला. किवी गोलंदाज पहिल्या डावात 10 विकेट्स घेणाऱ्या एजाझ पटेलने दुसऱ्या डावातही 4 विकेट्स घेतल्या. पण, तिसऱ्या दिवसाचा चहापानाचा ब्रेक 15 मिनिटं आधी घ्यावा लागला. यामागचे कारण आहे स्पाइडर-कॅम(spider cam). ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावातील चौथ्या षटकानंतर लगेचच एक मजेशीर घटना घडली. हे षटक अश्विनने टाकले आणि शेवटच्या चेंडूवर त्याने किवी कर्णधार टॉम लॅथमला बाद केले. भारतीय संघ ही विकेट पूर्ण सेलिब्रेटही करू शकला नाही, कारण स्पायडर-कॅममध्ये काहीतरी बिघाड झाला आणि तो मैदानाच्या अगदी जवळ आला. त्यामुळे खेळ थांबवावा लागला.

भारतीय खेळाडूंनीही ही संधी सोडली नाही आणि मैदानातच स्पायडर कॅमजवळ पोहचले. श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव आणि रविचंद्रन अश्विन यांनी कॅमेऱ्याच्या लेन्ससमोर हात लावत ते वर ढकलण्याचा प्रयत्न केला. पण स्पायडर कॅम वर गेला नाही. असे ५ मिनिटे चालले.

स्पायडर-कॅमेरा खराब झाल्यानंतर पंचांनी लवकर टी-ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ टी-ब्रेकसाठी मैदानातून ड्रेसिंग रूममध्ये परतत असताना विराट कोहलीही स्वत:ला रोखू शकला नाही आणि स्पायडर कॅमजवळ पोहोचला आणि त्याच्याशी बोलू लागला. सध्या या मजेशीर घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

First published: