मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ 2nd Test : 3, 19, 2, 9, 15! कॅप्टन कोहलीच्या करिअरला उतरती कळा, या आकड्यांनी वाढवली सर्वांची भिती

IND vs NZ 2nd Test : 3, 19, 2, 9, 15! कॅप्टन कोहलीच्या करिअरला उतरती कळा, या आकड्यांनी वाढवली सर्वांची भिती

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो. मात्र न्यूझीलंड दौरा विराटसाठी कर्दनकाळ ठरत आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो. मात्र न्यूझीलंड दौरा विराटसाठी कर्दनकाळ ठरत आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो. मात्र न्यूझीलंड दौरा विराटसाठी कर्दनकाळ ठरत आहे.

  • Published by:  Priyanka Gawde
क्राइस्टचर्च, 29 फेब्रुवारी : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो. मात्र न्यूझीलंड दौरा विराटसाठी कर्दनकाळ ठरत आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यात होत असलेल्या कसोटी मालिकेत पहिला सामना भारताला गमवावा लागला. पहिल्या सामन्यात विराटनं 2 आणि 19 धावा करत बाद झाला. तर, दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात पुन्हा विराटनं केवळ 3 धावा करत बाद झाला. टीम साउदीने विराटला 3 धावांवर यष्टीचित केलं. विराटनं रिव्ह्यु घेतला खरा, मात्र पंचांनी काही निर्णय बदलला नाही. यासह आणखी एक अयशस्वी खेळी विराटनं केली. न्यूझीलंड दौर्‍यात विराटने (एकदिवसीय आणि टी-20) केवळ एका अर्धशतकासह 204 धावा केल्या. टी -20 च्या 4 सामन्यांमध्ये त्याने 125 धावा आणि 3 एकदिवसीय सामन्यात 75 धावा केल्या. कोहली सध्या खराब फॉर्मशी झुंजत असल्याचे हे प्रथमच नाही. यापूर्वी, फेब्रुवारी 2014 ते ऑक्टोबर 2014 या काळात तिन्ही फॉर्मेटमध्ये 25 डावांनंतर एकही शतक लगावले नाही. यात इंग्लंड दौर्‍याचाही समावेश आहे. ज्यामध्ये तो 5 कसोटी सामन्यात केवळ 134 धावा करू शकला. वाचा-टीम इंडियात मतभेद? ‘या’ खेळाडूसाठी अजिंक्य रहाणेने घेतला कॅप्टन कोहलीशी पंगा वाचा-…तर विराटने IPL सोडावे, दिग्गज क्रिकेटपटू कॅप्टन कोहलीवर भडकला कोहलीच्या या फॉर्ममुळे त्याला कसोटी रॅकिंगमध्ये पहिले स्थान गमावले. कोहलीचा या फॉर्म पाहता 2014 इंग्लंड दौऱ्यापेक्षा हा दौरा कोहलीसाठी वाईट ठरला आहे. 2019 आयसीसी वर्ल्ड कपनंतर कोहलीला फक्त 2 शतक करता आले आहे. दोन्ही शतक त्यानं वेस्ट इंडिजविरुद्ध लगावले आहे. कोहलीच्या करिअरमध्ये पहिल्यांदा त्यानं 10पेक्षा कमीच्या सरासरीनं धावा केल्या आहेत. त्यामुळं हा दौरा कोहलीसाठी धोक्याची घंटा ठरला आहे. वाचा-विराटसाठी धोक्याची घंटा! 91 दिवस, 19 डावांआधी लगावले होते शतक कोहली 2011मध्ये 24 डावांत एकही शतक लगावले नव्हते कोहलीचा खराब फॉर्म फेब्रुवारी 2011पासून डिसेंबर 2011 खराब फॉर्ममध्ये होता. त्यावेळी 24 डावांत कोहलीने एकही शतक लगावले नव्हते. कोहलीनं आतापर्यंत आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये 70 शतक लगावले आहेत. यात 84 कसोटी सामन्यात 27 आणि 248 एकदिवसीय सामन्यात 43 शतक लगावले आहेत.
First published:

Tags: Cricket, India vs new Zealand, Virat kohli

पुढील बातम्या