INDvsNZ 2nd Test Day 1 LIVE : पहिल्या दिवशी भारतीय संघ बॅकफूटवर, न्यूझीलंडचा दबदबा कायम

INDvsNZ 2nd Test Day 1 LIVE : पहिल्या दिवशी भारतीय संघ बॅकफूटवर, न्यूझीलंडचा दबदबा कायम

पहिल्या कसोटी सामन्यात दारुण पराभव झाल्यानंतर टीम इंडियाला मालिका वाचवण्यासाठी विजय आवश्यक आहे.

  • Share this:

क्राइस्टचर्च, 29 फेब्रुवारी : भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा दबदबा राहिला. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 242 धावांवर संपला. त्यानंतर न्यूझीलंडने चांगली सुरुवात करत पहिल्या दिवसाअखेर एकही विकेट न गमावता 63 धावा केल्या. टॉम लॅथम 27 तर टॉम ब्लंडेल 29 धावांवर खेळत आहे.

पहिल्या डावात भारताच्या फलंदाजांनी सुमार कामगिरी केली. पृथ्वी शॉ (54), चेतेश्वर पुजारा (54)आणि हनुमा विहारी (55) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतानं पहिल्या डावात सर्वबाद 242 धावा केल्या. न्यूझीलंडने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताच्या मधल्या फळीला चांगली कामगिरी करता आली नाही, मात्र शमी आणि बुमराहनं यांनी दहाव्या विकेटसाठी 26 धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडकडून काईल जेमीसनने 5 विकेट घेतल्या.

भारताकडून सलामीसाठी उतरलेल्या मयंक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ यांनी केवळ 30 धावांची भागीदारी केली. त्यानंतर मयंक अग्रवाल 7 धावा करत बाद झाला. मात्र पुजारा आणि पृथ्वी शॉ यांनी भारताचा डाव सावरला. दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली, तर पृथ्वी शॉनं या दौऱ्यातील आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. मात्र शॉला मोठी खेळी करता आली नाही, जेमिसनच्या चेंडूवर शॉ 54 धावा करत बाद झाला. शॉ बाद झाल्यानंतर विराट कोहली मैदानावर आला. पहिल्या कसोटी सामन्यात फ्लॉप खेळी केलेल्या कोहलीला पुन्हा दणक्यात पुनरागमन करण्याची संधी होती. मात्र कोहली 3 धावा करत बाद झाला, साउदीनं टाकलेल्या आउटस्विंग चेंडूवर कोहली सावध खेळायला गेला पण बाद झाला. कोहलीनं रिव्ह्युही घेतला, मात्र भारताचा आणखी एक रिव्ह्यु अयशस्वी ठरला. तर अजिंक्य रहाणेही 7 धावांवर बाद झाला.

कोहली-रहाणे बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी यांनी भारताचा डाव सावरला. दोघांनी 81 धावांची भागीदारी. पुजारानं अर्धशतकी खेळी केल्यानंतर लगेचच पुढच्या चेंडूवर विहारीनेही अर्धशतक पूर्ण केले. मात्र 55 धावा करत हनुमा विहारी बाद झाला तर, पुजारा 54 धावांवर बाद झाला. चहापानानंतर भारताच्या डावाला उतरती कळा लागली. त्यानंतर एकाही फलंदाजांला चांगली खेळी करता आली नाही. पंत 12 धावांवर बाद झाला. तर जडेजा 9 धावांवर बाद झाला.

पृथ्वी शॉने मिळवले सचिनच्या पंक्तीत स्थान

न्यूझीलंडमध्ये कसोटी सामन्यात अर्धशतक ठोकणारा सर्वात तरुण फलंदाज सचिन तेंडुलकर आहे. सचिनने 1990मध्ये वयाच्या 16 वर्ष आणि 291 दिवसांमध्ये नेपियरमध्ये अर्धशतक झळकावले होते. त्याच वेळी, शॉ 20 वर्ष आणि 112 दिवसांचा आहे. या यादीत तिसर्‍या क्रमांकावर अतुल वासन आहे, ज्याने 1990 मध्ये ऑकलंडमध्ये 21 वर्ष 336 दिवस वयाच्या 50 धावा केल्या.

क्राइस्टचर्चचा रेकॉर्ड

क्राइस्टचर्चवर आतापर्यंत 6 सामने झाले आहेत. त्यात न्यूझीलंडने लंकेविरुद्ध दोन, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, इंग्लंड, बांगलादेश यांच्याविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळला आहे. बांगलादेशविरुद्धचा एक सामना रद्द झाला होता. या मैदानावर पहिला सामना 2014 मध्ये झाला होता. न्यूझीलंडने तो सामना 8 गडी राखून जिंकला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर न्यूझीलंडने पाकिस्तान, बांगलादेश आणि लंकेला पराभूत केलं होतं. भारतीय गोलंदाजांना या मैदानावर लक्ष्य केलं जाण्याची शक्यता आहे.

वाचा : 'पांड्या इज बॅक' धमाकेदार प्रदर्शन करत जिंकून दिला सामना, भारताचे 2 दिग्गज फेल

First published: February 29, 2020, 7:06 AM IST

ताज्या बातम्या