मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ 2nd Test : विराटनं सर्वांसमोर ‘या’ फलंदाजावर केली होती टीका, त्यानेच केली कॅप्टनची बोलती बंद

IND vs NZ 2nd Test : विराटनं सर्वांसमोर ‘या’ फलंदाजावर केली होती टीका, त्यानेच केली कॅप्टनची बोलती बंद

दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या दिवशी भारतानं सर्वबाद 242 धावा केल्या. तर न्यूझीलंडनं पहिल्या दिवशी एकही विकेट न गमावता 63 धावा केल्या.

दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या दिवशी भारतानं सर्वबाद 242 धावा केल्या. तर न्यूझीलंडनं पहिल्या दिवशी एकही विकेट न गमावता 63 धावा केल्या.

दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या दिवशी भारतानं सर्वबाद 242 धावा केल्या. तर न्यूझीलंडनं पहिल्या दिवशी एकही विकेट न गमावता 63 धावा केल्या.

    ख्राइस्टचर्च, 29 फेब्रुवारी : न्यूझीलंडविरुद्ध भारत सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. यातील पहिला सामना भारतानं याआधीच 10 विकेटनं गमावला आहे. तर, दुसरा सामना सुरू झाला आहे. पहिल्या दिवशी भारतानं सर्वबाद 242 धावा केल्या. तर न्यूझीलंडनं पहिल्या दिवशी एकही विकेट न गमावता 63 धावा केल्या. भारताकडून पृथ्वी शॉ (54), चेतेश्वर पुजारा (54)आणि हनुमा विहारी (55) यांच्या अर्धशतकी खेळीनं डाव सावरला. चेतेश्वर पुजारनं सुरुवातीला पृथ्वी शॉसोबत त्यानंतर विहारीसोबत यशस्वी भागीदारी केली. त्यामुळं भारताचा डाव सावरला. मात्र याआधी पहिल्या सामन्यात मिळालेल्या लाजीरवाणा पराभवानंतर कोहलीने पुजारावर टीका केली होती. वाचा-पहिल्या दिवशी भारतीय संघ बॅकफूटवर, न्यूझीलंडचा दबदबा कायम पहिल्या सामन्यानंतर कोहलीने पुजारावर धिमी फलंदाजी केल्याचा आरोप केला होता. पहिल्या सामन्यात दोन्ही डावांमध्ये पुजाराने 11-11 धावा केल्या होत्या. मात्र दुसऱ्या सामन्यात पुजाराने अर्धशतकी खेळी केली. पहिल्या डावात पुजारा 140 चेंडूत 54 धावा करत बाद झाला. तर, दुसरीकडे विराट केवळ 3 धावा करत बाद झाला. वाचा-3, 19, 2, 9, 15! कॅप्टन कोहलीच्या करिअरला उतरती कळा कोहलीनं पुजारावर साधला होता निशाणा वेलिंग्टन कसोटीत पुजारा दोन्ही डावांमध्ये फ्लॉप होता, त्याने पहिल्या आणि दुसर्‍या डावात 11-11 धावा केल्या. त्याच्या दुसर्‍या 11 धावांची खेळी जरी अत्यंत संथ होती. पुजाराने 81 चेंडूत 11 धावा काढल्या होत्या. कसोटी गमावल्यानंतर विराट कोहलीने फलंदाजांना आक्रमक फलंदाजी करण्याचा सल्ला दिला. सामन्यानंतर विराट कोहलीने पुजारावर निशाणा साधत, ''माझ्या मते फलंदाजी युनिट म्हणून आपण वापरत असलेली भाषा दुरुस्त करावी लागेल. मला वाटत नाही की सावधगिरी बाळगणे किंवा खूप काळजी घेणे मदत करेल कारण अशा परिस्थितीत आपण आपले शॉट्स खेळू शकणार नाही. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी विराट कोहलीला खेळण्याची संधी देखील दिली नाही, ज्यामुळे तो दोन्ही डावांमध्येही फ्लॉप झाला. विराटने पहिल्या डावात दोन आणि दुसऱ्या डावात 2 आणि 19 अशा धावा केल्या. तर, दुसऱ्या सामन्यात त्यानं 3 धावा केल्या. वाचा-टीम इंडियात मतभेद? ‘या’ खेळाडूसाठी अजिंक्य रहाणेने घेतला कॅप्टन कोहलीशी पंगा अजिंक्य रहाणेनं घेतली होती पूजाराची बाजू विराट कोहलीनं वेलिंग्टन कसोटीमध्ये धिम्या गतीनं फलंदाजी केलेल्या पुजारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र रहाणेनं पुजाराची बाजू घेतली आहे. रहाणेनं सांगितले की, “पुजारा पूर्णत: प्रयत्न करत आहे की तो आपल्या धावांवर लक्ष केंद्रित करेल. मात्र बोल्ट, साऊदी यांसारख्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. त्यामुळं पुजारावर टीका करणे योग्य नाही”. पहिल्या कसोटी सामन्यात पुजाराला मोठी खेळी करता आली नव्हती. मात्र त्यानं दुसऱ्या सामन्यात 54 धावांची खेळी केली.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cheteshwar pujara, Cricket, India vs new Zealand, Virat kohli

    पुढील बातम्या