India vs New Zealand 2nd T20 : टीम इंडियाने फडकावला विजयी तिरंगा, दुसरा टी-20 सामना जिंकला

India vs New Zealand 2nd T20 : टीम इंडियाने फडकावला विजयी तिरंगा, दुसरा टी-20 सामना जिंकला

पहिल्या सामन्यात विजय मिळवत भारतानं पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत 2-0ने आघाडी घेतली आहे.

  • Share this:

ऑकलंड, 26 जानेवारी : भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने 7 गडी राखून विजय मिळवला. सलामीवीर रोहित शर्मा आणि विराट कोहली लवकर बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी फटकेबाजी करत भारताला विजय मिळवून दिला. त्याआधी भारतीय गोलंदाजांचा दबदबा दिसला. भारताच्या गोलंदाजीसमोर 20 षटकांत न्यूझीलंडने 132 धावा केल्या. भारताने हे आव्हान 17.2 षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. केएल राहुलने नाबाद अर्धशतक तर श्रेयस अय्यरने 44 धावा केल्या. अय्यर बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या शिवम दुबेने षटकार मारून विजयावर शिक्कामोर्तब केलं.

तत्पूर्वी, न्यूझीलंडने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मार्टिन गुप्टिल आणि कॉलिन मुनरो यांनी आक्रमक सुरुवात केली. अखेर विराट कोहलीनं उत्कृष्ठ झेल घेत शार्दूल ठाकूरच्या चेंडूवर गुप्टिलला 33 धावांवर बाद केले. त्यामुळं या सलामीवीरांची जोडी 48 धावांची भागीदारी फोडली. त्यानंतर लगेचच शिवम दुबेनं कॉलिनला 26 धावांवर विराटच्या हाती कॅच देत माघारी धाडले. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे किवींच्या फलंदाजांना कमबॅक करण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर रवींद्र जडेजानं कॉलिन डी ग्रॅंडहोम आणि फॉर्ममध्ये असलेल्या कर्णधार केन विल्यमसनला 14 धावांवर बाद केले. त्यानंतर रॉस टेलरही 18 धावांवर बाद झाला. त्यामुळं पहिल्या सामन्यात 203 धावांची मजल मारणाऱ्या किवींनी या सामन्यात 132 धावा केल्या.

हेड टू हेड

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकूण 12 टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारताने 4 आणि न्यूझीलंडने 8 जिंकले आहेत. न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांविषयी बोलताना, येथे दोन्ही संघांमध्ये एकूण सहा सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारताने दोन जिंकला आहे तर न्यूझीलंडने चार जिंकले आहेत. ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानाविषयी बोलताना, दोन्ही संघांमध्ये दोन टी -20 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत, दोन्ही सामने भारतने जिंकले आहे.

फलंदाजांचा फॉर्म फायद्याचा

पहिल्या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी 204 धावांचे लक्ष्य होते, जे भारतीय संघाने सहा गडी राखून मिळवले. टीम इंडियाची चांगली सुरुवात मिळाली नाहीस कारण रोहित अवघ्या सात धावांवर बाद झाला. यानंतर केएल राहुलने 56 आणि विराटने 45 धावांचा डाव खेळला आणि श्रेयस अय्यरला विजयाचा पाया दिला. श्रेयसच्या न्यूझीलंडमधील कारकिर्दीतील हा पहिला टी-20 सामना होता, आता दुसरा टी-20 सामना 26 जानेवारी रोजी होणार आहे.

भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर.

न्यूजीलंड: केन विलय्मसन (कर्णधार) , मार्टिन गुप्टिल, रॉस टेलर, स्कॉट कजेलेजिन, कॉलिन मुनरो, कॉलिन डी ग्रैंडहोम, टॉम ब्रूस, डेरिल मिशेल, मिशेल सेंटनेर, टिम सीफर्ट , हामिश बेनेट, ईश सोढ़ी, टिम साउदी, ब्लेयर टिकनेर.

First published: January 26, 2020, 3:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading