IND vs NZ : क्रिकेट चाहत्यांसाठी सुपर संडे! येथे पाहा भारत-न्यूझीलंड दुसरा सामना LIVE

IND vs NZ :  क्रिकेट चाहत्यांसाठी सुपर संडे! येथे पाहा भारत-न्यूझीलंड दुसरा सामना LIVE

भारत-न्यूझीलंड यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज ईडन गार्डनवर होत आहे.

  • Share this:

ऑकलंड, 26 जानेवारी : भारत-न्यूझीलंड यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज होत आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही न्यूझीलंडवर दबदबा कायम राखण्यासाठी विराटसेना सज्ज आहे. आज ईडन गार्डनवर भारत-न्यूझीलंड सामना होईल. त्यामुळं पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार 12.20 वाजता सुरू होईल. Star Sports Network वर दुसरा सामना पाहिला जाऊ शकतो.

वाचा-जसप्रीत बुमराह दुसऱ्या सामन्याला मुकणार? किवींची शिकार करण्यासाठी विराटसेना सज्ज

फलंदाजांचा फॉर्म फायद्याचा

पहिल्या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी 204 धावांचे लक्ष्य होते, जे भारतीय संघाने सहा गडी राखून मिळवले. टीम इंडियाची चांगली सुरुवात मिळाली नाहीस कारण रोहित अवघ्या सात धावांवर बाद झाला. यानंतर केएल राहुलने 56 आणि विराटने 45 धावांचा डाव खेळला आणि श्रेयस अय्यरला विजयाचा पाया दिला. श्रेयसच्या न्यूझीलंडमधील कारकिर्दीतील हा पहिला टी-20 सामना होता, आता दुसरा टी-20 सामना 26 जानेवारी रोजी होणार आहे.

वाचा-केएल राहुलच्या खेळामुळे पंतचे भविष्य धोक्यात? सौरव गांगुलीचा मोठा खुलासा

हेड टू हेड

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकूण 12 टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारताने 4 आणि न्यूझीलंडने 8 जिंकले आहेत. न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांविषयी बोलताना, येथे दोन्ही संघांमध्ये एकूण सहा सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारताने दोन जिंकला आहे तर न्यूझीलंडने चार जिंकले आहेत. ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानाविषयी बोलताना, दोन्ही संघांमध्ये दोन टी -20 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत, दोन्ही सामने भारतने जिंकले आहे.

वाचा-मनीष पांडेने केली मोठी चूक! पंचांमुळे वाचला भारतीय संघ, पाहा VIDEO

भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, मनीष पांडे, ऋषभ पंत, संजु सॅमसन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर.

न्यूजीलंड: केन विलय्मसन (कर्णधार) , मार्टिन गुप्टिल, रॉस टेलर, स्कॉट कजेलेजिन, कॉलिन मुनरो, कॉलिन डी ग्रैंडहोम, टॉम ब्रूस, डेरिल मिशेल, मिशेल सेंटनेर, टिम सीफर्ट , हामिश बेनेट, ईश सोढ़ी, टिम साउदी, ब्लेयर टिकनेर.

First published: January 26, 2020, 10:11 AM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading