मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

पुन्हा विराटचा पारा चढला, पंचांच्या त्या चुकीवर मैदानातच काढला राग

पुन्हा विराटचा पारा चढला, पंचांच्या त्या चुकीवर मैदानातच काढला राग

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना ईडन पार्क मैदानावर होत आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना ईडन पार्क मैदानावर होत आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना ईडन पार्क मैदानावर होत आहे.

  • Published by:  Akshay Shitole
ऑकलंड, 08 फेब्रुवारी: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना ईडन पार्क मैदानावर होत आहे. यावेळी भारतानं टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. सामन्यादरम्यान कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा पंचांनी दिलेल्या निर्णयावर नाराजी दर्शवल्याचं पाहायला मिळालं. विराटनं यावेळी मैदानात पंचांनी Umpire Decision Review System बाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात नाराजी दर्शवली आहे. हा निर्णय भारतीय संघाच्या बाजूनं असल्यामुळे जास्त वाद झाला नाही. 17व्या ओवरमध्ये यजुवेंद्र चहल गोलंदाजी करत असताना हा सगळा प्रकार घडला. 17 व्या ओवरमध्ये 5 व्या बॉलनंतर बॅट्समन हेन्री निकोलस हा एलबीडब्ल्यू आऊट असल्याचं घोषित केलं.डीआरएस नियमानुसार पंचांना त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा रिव्ह्यू करण्यासाठी गोलंदाजी करणाऱ्याकडे 15 सेकंदाचा वेळ असतो. रिव्ह्यू घेण्यापूर्वी निकोलसने त्याचा जोडीदार मार्टिन गुप्टिल याच्याशी चर्चा केली आणि जेव्हा त्याने रिव्ह्यूसाठी इशारा केला तेव्हा टाइमरमधील वेळ शून्य दाखवली जात होती. म्हणजेच रिव्ह्यूसाठी देण्यात आलेली 15 सेकंदांची मुदत संपली. त्यांच्या चर्चेतच 15 सेकंद गेल्यामुळे कर्णधार विराट कोहली चांगलाच चिडला होता. शार्दुल ठाकूरने न्यूझीलंडला दुसरा धक्का देत टॉम ब्लंडेल 22 धावांवर बाद केलं आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला लाजीरवाणा पराभव सहन करावा लागला होता. त्यामुळं मालिकेत बरोबरी करण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे गरजेचे आहे. हेही वाचा-विराटला सपोर्ट करण्यासाठी अनुष्काची Instagram वर 'Hi Kiwi' पोस्ट याआधी टी-20 मालिका 5-0ने जिंकल्यानंतर एकदिवसीय मालिकेतही भारत शानदार कामगिरी करेल असे वाटले होते. मात्र पहिल्या सामन्यात खराब गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामुळे भारताला हा सामना गमवावा लागला. दुसरा सामना ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानावर होणार आहे. त्यामुळं फलंदाजी करण्याला संघाला या मैदानाचा फायदा होईल. पहिल्या सामन्यात भारताने दिलेले 348 धावांचे लक्ष्य रॉस टेलरच्या ऐतिहासिक खेळीमुळं न्यूझीलंडने पार केले. या सामन्यात रॉस टेलरने 84 चेंडूत 109 धावा करत हिरो ठरला. याआधी टी-20 सामन्यांमध्येही त्याने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळं रॉस टेलरचा फॉर्म भारतासाठी धोक्याचा ठरू शकतो. तर, न्यूझीलंडच्या टॉम लॅथमने 48 चेंडूंमध्ये केलेल्या 69 धावांच्या खेळीने भारताच्या तोंडचा घास पळवला होता. त्यामुळं न्यूझीलंडची मदार ही या दोन फलंदाजांवर असेल. तर न्यूझीलंडचा हुकुमी एक्का केन विल्यम्सन दुसऱ्या एकदिवसीय सामन्यालाही मुकणार आहे. हेही वाचा-सचिनचा मोठा खुलासा! ‘या’ ऑस्ट्रेलियन फलंदाजात दिसते स्वत:ची छबी
First published:

Tags: Cricket (Sport), New zealand vs india, Sport news, Sports, Virat kohali

पुढील बातम्या