मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'माझ्या बायकोला गिफ्ट दिल्याबद्दल थँक्स' सूर्यकुमार यादवने बोल्टचे का मानले आभार?

'माझ्या बायकोला गिफ्ट दिल्याबद्दल थँक्स' सूर्यकुमार यादवने बोल्टचे का मानले आभार?

Suryakumar Yadav

Suryakumar Yadav

क्रिकेट जगतात सूर्यकुमारच्या (suryakumar yadav) खेळीचे कौतुक होत असतानाच त्याचा हटके किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

जयपुर, 18 नोव्हेंबर: टीम इंडियानं न्यूझीलंड विरुद्धच्या (IND vs NZ) टी20 सीरिजची विजयानं सुरूवात केली आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये बुधवारी झालेल्या पहिल्या टी20 मॅचमध्ये भारतीय टीमनं 5 विकेट्सनं विजय मिळवला. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. सूर्यकुमारने 40 चेंडूत 62 धावा करत मालिकावीर पुरस्कार पटकावला. क्रिकेट जगतात सूर्यकुमारच्या खेळीचे कौतुक होत असतानाच त्याचा हटके किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

के एल राहुलची विकेट गेल्यानंतर सूर्यकुमार यादवने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना अर्धशतक लगावलं. विराट कोहलीच्या अनुपस्थित सूर्यकुमार तिसऱ्या क्रमांकावर खेळत आहे.

मॅच संपल्यानंतर सूर्यकुमार यादवने माध्यामांशी संवाद साधला. यावेळी त्याने 16 व्या ओव्हरदरम्यानचा किस्सा सांगत ट्रेंट बोल्टचे आभार मानले.

16 व्या ओव्हरमध्ये सूर्यकुमार यादवला जीवनदान मिळाले. ट्रेंट बोल्टने सूर्यकुमार यादवचा झेल सोडला आणि चेंडू सीमापार गेला. मॅच संपल्यानंतर सूर्यकुमारने बोल्टचे आभार मानले. आजा माझ्या बायकोचा वाढदिवस असून हे परफेक्ट गिफ्ट असल्याचे सूर्यकुमारने म्हटले आहे.

तसेच आपल्या खेळीवर त्याने मत व्यक्त केले. तो म्हणाला, मी काहीही वेगळं केलेलं नसून, गेल्या तीन ते चार वर्षांपासून जे करत होतो तेच केलं. मी नेटमध्येही त्याच पद्धतीने खेळतो आणि सामन्यातही. नेटमध्ये खेळताना मी स्वत:वर खूप दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो. नेटमध्ये खेळताना आऊट झाल्यानंतर मी नेमकं काय चुकलं याचा विचार करतो आणि याचा फायदा मला मैदानात खेळताना होतो,” असे सूर्यकुमारने सांगितले आहे.

जयपूर येथे झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने दिलेले 165 धावांचे लक्ष्य भारताने 19.4 षटकांत गाठत तीन सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

First published:

Tags: India, New zealand, Suryakumar yadav