नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर: भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) मुंबई क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथे सरावासाठी पोहोचला आहे. पहिल्या टेस्ट मॅचमधील हिस्सा नसला तरी कोहली मुंबई येथे खेळवण्यात येणाऱ्या न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या टेस्ट(IND vs NZ) मॅचमध्ये सहभागी होणार आहे. दुसऱ्या टेस्ट मॅचपूर्वी, विराट कोहलीने मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सराव सुरू केला आहे. दरम्यान, त्याने स्टेडिअममधील एक भन्नाट फोटो शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
टेस्ट मॅचपूर्वी, विराट कोहलीने आपल्या मांडीवर बसलेल्या मांजरीचा एक फोटो शेअर केला आहे, जो खूप जोरदार व्हायरल होत आहे. त्यावर पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनेही कमेंट केली आहे. अनुष्काची कमेंट पाहून विराटने तिला भन्नाट उत्तर दिले आहे.
विराट कोहलीने सराव सामन्यादरम्यान मांजरासोबत खेळतानाचे दोन फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत विराटने 'एक हॅलो सराव करताना कुल मांजरीकडून' असे म्हटले आहे. त्याच हा फोटो पाहून, पत्नी अनुष्का शर्मानेही मांजरीली हॅलो म्हटले आहे. पण अनुष्काच्या या कमेंटवर भन्नाट रिप्लाय दिला आहे. 'लौंडा फ्रॉम दिल्ली एंड मुंबई की बिल्ली' असा हटके रिप्लाय त्याने अनुष्काच्या कमेंटवर दिला आहे.
विराट कोहली ICC T20 वर्ल्डकप 2021 पासून विश्रांतीवर आहे. आणि 3 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यासाठी टीम इंडियामध्ये सामील होईल. ब्रेक दरम्यान विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकासोबत चांगला वेळ घालवत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anushka sharma, Cricket, Cricket news, Virat kohli