• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs NZ विल्यमसननंतर किवींचा आणखी एक खेळाडू टी20 सीरीजमधून OUT

IND vs NZ विल्यमसननंतर किवींचा आणखी एक खेळाडू टी20 सीरीजमधून OUT

Kyle Jamieson opts out of T20 series

Kyle Jamieson opts out of T20 series

भारत विरुद्ध न्यूझीलंड (Ind vs NZ) यांच्यातील तीन टी20 आणि 2 टेस्ट मॅचच्या मालिकेला आजपासून (बुधवार) जयपूरमध्ये सुरूवात होत आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील तीन टी20 आणि 2 टेस्ट मॅचच्या मालिकेला आजपासून (बुधवार) जयपूरमध्ये सुरूवात होत आहे. दरम्यान, न्यूझीलंडसंघाला कर्णधार केल विल्यमसननंतर आणखी एका खेळाडूने धक्का दिला आहे. वेगवान गोलंदाज काइल जेमिसनने (Kyle Jamieson opts out of T20 series) टीम इंडियाविरुद्ध होणाऱ्या टी20 सीरीजमधून बाहेर होण्याचा निर्णय घेतला आहे. जेमिसनला कसोटी फॉरमॅटमध्ये लक्ष केंद्रित करायचे आहे आणि त्यामुळेच त्याने टी-20 मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. पहिली कसोटी कानपूर आणि दुसरी कसोटी मुंबईत खेळवली जाणार आहे. 25 नोव्हेंबरपासून सुरू होणारी ही कसोटी मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग आहे. संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी याला दुजोरा दिला. त्याने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, 'केन विल्यमसन आणि काइल जेमिसन यांच्याशी बोलल्यानंतर आम्ही निर्णय घेतला आहे की हे दोन्ही खेळाडू टी-20 मालिकेत खेळतील. कसोटी मालिकेसाठी तो संघात सामील होणार आहे. न्यूझीलंड हा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा पहिला विजेता आहे. त्याने यावर्षी जूनमध्ये भारताचा पराभव करून ही स्पर्धा जिंकली होती. न्यूझीलंडनं कॅप्टन केन विल्यमसनला (Kane Williamson) विश्रांती दिली आहे. केन आता टेस्ट सीरिजमध्ये मैदानात उतरेल. विल्यमसनच्या जागी टीम साऊदी (Tim Southee) टीमचं नेतृत्त्व करेल. न्यूझीलंडच्या टीममध्ये अनेक टी20 स्पेशालिस्ट खेळाडूंचा समावेश आहे. त्यांना हरवण्यासाठी टीम इंडियाला चांगलाच घाम गाळावा लागेल. तसेच, टीम इंडियानं या सीरिजमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंना विश्रांती दिली असून तरूण खेळाडूंना संधी दिली आहे. या मालिकेत टीम इंडियात प्रयोग होणार असून त्याचा फायदा तरूण खेळाडू कसं उठवणार हे समजणार आहे. रोहित शर्मा आणि राहुल द्रविड या कॅप्टन-मुख्य प्रशिक्षक जोडीची ही पहिलीच स्पर्धा आहे. त्यामुळे याची टीम इंडियाच्या फॅन्सना मोठी उत्सुकता आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published: