मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ: कानपूर टेस्ट मॅचपूर्वी चेतेश्वर पुजाराने किवींसाठी वाजवली धोक्याची घंटा, म्हणाला...

IND vs NZ: कानपूर टेस्ट मॅचपूर्वी चेतेश्वर पुजाराने किवींसाठी वाजवली धोक्याची घंटा, म्हणाला...

Cheteshwar Pujara

Cheteshwar Pujara

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील पहिली टेस्ट मॅच 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये सुरू होत आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

कानपूर, 23 नोव्हेंबर: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील पहिली टेस्ट मॅच 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये सुरू होत आहे. या मॅचपूर्वी उपकर्णधार चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) पत्रकार परिषद घेतली आणि त्यात केलेल्या वक्तव्याने न्यूझीलंडसाठी धोक्याची घंटा वाजली. पुजाराने आपण लवकरच शतक झळकावणार असल्याचे सांगितले आहे. त्याने हे फक्त स्वतःबद्दल सांगितले. यासह रहाणदेखीव (Ajinkya Rahane) शतक झळकावण्याची शक्यता त्याने यावेळी वर्तवली आहे.

शतकाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर पुजारा म्हणाला की, काळजी करण्यासारखे काही नाही. मी 50-60 धावा करत आहे. आणि जोपर्यंत मी असा खेळत आहे, तोपर्यंत काळजी करण्यासारखे काही नाही. शतकही लवकरच झळकवणार आहे. अजिंक्य रहाणेबाबतही त्याने हेच सांगितले. पुजारा म्हणाला, रहाणे हा मोठा खेळाडू आहे. काही वेळा खेळाडूला वाईट टप्प्यातून जावे लागते. तो त्याच्या जुन्या फॉर्मपासून फक्त एक डाव दूर आहे. तो चांगल्या स्थितीत आहे आणि मला वाटते की तो या मालिकेत धावा करेल.

कानपूरची खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करेल

चेतेश्वर पुजाराने कानपूरच्या ग्रीन पार्कच्या खेळपट्टीबद्दलही सांगितले. म्हणाला, “मी आज खेळपट्टी पाहिली. पण माझ्या अनुभवाप्रमाणे फिरकीपटूंना मदत करणे अपेक्षित आहे. आम्ही न्यूझीलंडला हलक्यात घेणार नाही आणि त्यांच्यासाठी सर्व तयारी करू. तसेच, सध्या आमचे लक्ष टीम इंडियाच्या विजयावर आहे. आणि त्याच इराद्याने आम्ही मैदानात उतरू.

पुजारा म्हणाला की, आम्ही इंग्लंडमध्ये चांगला खेळ दाखवला होता. मालिकेत दमदार पुनरागमन केले. आता हाच क्रम न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही कायम ठेवावा लागणार आहे. पुजाराने राहुल द्रविडच्या कोचिंगवरही एक विधान केले आणि सांगितले की, त्याला ज्या प्रकारचा अनुभव आहे, तो आम्हाला मालिकेत मदत करेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडची क्रिकेटच्या दीर्घ फॉरमॅटमधील ही पहिली मोठी परीक्षा असेल.

First published:

Tags: Ajinkya rahane, New zealand, Pujara, Test series