IND vs NZ Day 3 Live: अजिंक्य रहाणेनं सावरला भारताचा डाव, न्यूझीलंडकडे अजूनही 39 धावांची आघाडी

IND vs NZ Day 3 Live: अजिंक्य रहाणेनं सावरला भारताचा डाव, न्यूझीलंडकडे अजूनही 39 धावांची आघाडी

भारतीय संघावर पराभवाची टांगती तलवार. चौथ्या दिवशीचा खेळ ठरवणार भारताचे भवितव्य.

  • Share this:

वेलिंग्टन, 23 फेब्रुवारी : भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. तिसऱ्या दिवशी भारताचा खेळ 144-4 धावांवर संपला. अजिंक्य रहाणे (25) आणि हनुमा विहारी (15)यांच्या संयमी खेळी केली. मात्र अजूनही न्यूझीलंडकडे 39 धावांची आघाडी आहे. याआधी मयंक अग्रवालनं 58 धावा करत भारताचा डाव सावरला होता. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टनं 3 तर टीम साउथीने 1 विकेट घेतली

दरम्यान, या सामन्यातही विराटला चांगली खेळी करत आली नाही पहिल्या डावात केवळ 2 धावांवर बाद झालेल्या कोहलीला बोल्टनं दुसऱ्या डावात शिकार करत 19 धावांवर बाद केले. त्यामुळं आधीच अडचणीत सापडलेल्या टीम इंडियावर आता पराभवाची टांगली तलवार आहे. चौथ्या दिवशी रहाणे आणि विहारी यांनी चांगली भागीदारी करावी लागणार आहे.

तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा पहिला डाव 348 धावांत संपला. त्यामुळं न्यूझीलंड संघाला तब्बल 183 धावांची आघाडी मिळाली आहे. भारताकडून इशांत शर्माने 5, अश्विनने 3 तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीनं प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. बोल्टनं पृथ्वी शॉला 14 धावांवर बाद करत भारताला पहिला झटका दिला. त्यानंतर चेतेश्वर पुजाराला 11 धावांवर बाद केले. भारताकडून मयंक अग्रवालनं अर्धशतकी खेळी केली. मयंक भारताला चांगल्या स्थितीत पोहचवेल असे वाटत असताना अग्रवालला टीम साऊथीनं 58 धावांवर माघारी धाडले. त्यानंतर लगेचच कोहलीला बोल्टनं वॉलिटिंगच्या हाती झेल देत 19 धावांवर बाद केले. सध्या रहाणे आणि हनुमा विहारी फलंदाजी करत आहेत.

याआधी भारताचा पहिला डावा 165 डावांवर संपुष्टात आला. भारताकडून अजिंक्य रहाणेनं सर्वाधिक 46 धावा केल्या. न्यूझीलंडकडून कर्णधार केन विल्यम्सननं महत्त्वपूर्ण 89 धावांची खेळी. केन आणि रॉस टेलर (44) यांच्यात चांगली भागीदारी केली. त्यांनतर ग्रॅंडहोमनं 44 तर तळाचे फलंदाज जॅमीसन (44) आणि ट्रेंट बोल्ट (38) यांनी शतकी भागीदारी केली. दरम्यान भारताच्या दुसऱ्या डावात पृथ्वी शॉ 14 धावांवर बाद झाला. तर चेतेश्वर पुजाराला बोल्टनं 11 धावांवर बोल्ड केले. मयंक अग्रवालनं अर्धशतकी खेळी करत सध्या मैदानावर भारताचा पराभव टाळण्याचा प्रयत्न करत आहे. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारतानं तीन महत्त्वाच्या विकेट घेतल्या. मात्र तळाच्या फलंदाजांना बाद करणे भारताला जमले नाही. त्यामुळं जॅमीसन आणि ट्रेंट बोल्ट यांनी विजयी आघाडी मिळवली.

विराटसाठी धोक्याची घंटा

दरम्यान या सामन्यात कर्णधार विराट कोहलीला केवळ 2 धावा काढता आल्या. त्यामुळं विराटचा फॉर्म हा भारतीय संघासाठी धोक्याची घंटा आहे. विराटनं 19 डावांत (कसोटी, एकदिवसीय आणि टी-20) एकही शतक लगावलेले नाही. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या डावात विराटनं केवळ 7 चेंडूंचा सामना केला आणि तो बाद झाला. विराटनं अखेरचे शतक बांगलादेशविरुद्ध नोव्हेंबरमध्ये लगावले होते. म्हणजे तब्बल 91 दिवस झाल्यानंतरही त्याने शतक लगावलेले नाही.

20 वर्षांपूर्वी याच परिस्थितीत भारताने जिंकला होता सामना

न्यूझीलंडची 183 धावांची आघाडी भारतासाठी मोठी असू शकते. त्यामुळं भारत पराभवाच्या वाटेवर वाटत असला तरी, याआधी भारतानं या परिस्थितीवर मात देत विजय मिळवला होता. 20 वर्षांपूर्वी असा प्रकार घडला होता. 2000मध्ये कोलकाता येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात भारत पहिल्या डावात 274 धावांनी पिछाडीवर होता, परंतु असे असूनही सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारताने हा सामना जिंकला. याआधी पहिल्यांदा 1976मध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने 131 धावांनी पिछाडीवर असतानाही विजय मिळविला होता.

First published: February 23, 2020, 11:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading