Weather Forecast, IND vs NZ 1st T20I: पहिल्या टी-20 सामन्यावर पावसाचे सावट, सामना होणार रद्द?

Weather Forecast, IND vs NZ 1st T20I: पहिल्या टी-20 सामन्यावर पावसाचे सावट, सामना होणार रद्द?

भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध आज पहिला टी-20 सामना खेळणार आहे. यावर्षातला हा भारताचा पहिला विदेश दौरा असेल.

  • Share this:

ऑकलंड, 24 जानेवारी : भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध आज पहिला टी-20 सामना खेळणार आहे. यावर्षातला हा भारताचा पहिला विदेश दौरा असेल, त्यामुळं ऑस्ट्रेलिया होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं विराचसेनेसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. आज ऑकलंड ईडन पार्क मैदानावर पहिला सामना खेळला जाणार आहे. मात्र सकाळी पाऊस पडल्यामुळं दोन्ही संघ सध्या चिंतेत आहे.

ऑकलंडच्या हवामानावर एक नजर टाकल्यास आज सकाळी पावसाच्या हलक्या सरी होत्या, मात्र सध्या ऊन पडल्यामुळं सामन्याला वेळेवर सुरुवात होईल. मात्र सामन्यादरम्यान पाऊस पडू शकतो. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार पावसाच्या सरी बरसल्या तरी सामन्यावर त्याचा विशेष परिणाम होणार नाही.

वाचा-पहिल्या टी-20साठी टीम इंडिया सज्ज, येथे पाहा LIVE सामना

याआधी ऑकलंडमध्ये नुकताच एक टी-20 सामना पावसामुळं अडचणीत आला होता. इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यातील सामना 11-11 ओव्हरचा खेळवण्यात आला होता. मात्र आजच्या सामन्यात अशा परिस्थितीची शक्यता कमी आहे.

वाचा-भारत-न्यूझीलंडमध्ये कॉंटे की टक्कर! ‘या’ खेळाडूंना विराट देणार संघात जागा संघ

ईडन पार्क मैदानावर पडणार धावांचा पाऊस

आतापर्यंत या मैदानावर 19 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये पाच वेळा 200 पेक्षा जास्त वेळा स्कोअर झाला आहे. या खेरीज दोन्ही खेळींमध्ये फलंदाजीसाठीही या खेळपट्ट्या चांगली आहेत. दरम्यान भारतानं याआधी दक्षिण आफ्रिकाविरुद्ध वगळता सर्व टी-20 मालिका जिंकल्या आहेत. मात्र भारतासाठी ही मालिका जिंकणे कठिण असणार आहे. सध्या भारतीय संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे, असे असले तरी शिखर धवन जखमी असल्यामुळं सलामीला रोहित-विराटची जोडी उतरेल. त्यानंतर विराट तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो.

वाचा-वर्ल्ड कपमधल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी उतरणार भारत? विराटनं सांगितला प्लॅन

टी-20 मालिका-

24 जानेवारी- पहिला टी20 सामना

26 जानेवारी- दुसरा टी20 सामना

29 जानेवारी-तिसरा टी20 सामना

31 जानेवारी-चौथा टी20 सामना

2 फेब्रुवारी-पाचवा टी20 सामना

First published: January 24, 2020, 11:08 AM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या