India vs New Zealand 1st T20 Live Streaming: पहिल्या टी-20साठी टीम इंडिया सज्ज, येथे पाहा LIVE सामना

India vs New Zealand 1st T20 Live Streaming: पहिल्या टी-20साठी टीम इंडिया सज्ज, येथे पाहा LIVE सामना

आजचा सामना ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यात धावांचा पाऊस पाहायला मिळू शकतो.

  • Share this:

ऑकलंड, 24 जानेवारी : भारत-न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. आजचा सामना ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यात धावांचा पाऊस पाहायला मिळू शकतो. टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ईडन पार्क मोठ्या धावसंख्येसाठी ओळखला जातो.ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने हा सामना भारतासाठी महत्त्वाचा असणार आहे.

दरम्यान, भारतासमोर सध्या दुखापतींचे आव्हान असले तरी भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. धवन दुखापतीमुळे हा सामना खेळू शकणार नसल्यामुळं केएल राहुलला पुन्हा सलामीला खेळण्याची संधी मिळू शकते. भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानावर भारतीय वेळेनुसार 12.20 वाजता सुरू होईल. हा सामना Star Sports Network वर पाहिला जाऊ शकतो.

वाचा-भारत-न्यूझीलंडमध्ये कॉंटे की टक्कर! ‘या’ खेळाडूंना विराट देणार संघात जागा संघ

हेड टू हेड

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकूण 11 टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारताने तीन आणि न्यूझीलंडने आठ जिंकले आहेत. न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांविषयी बोलताना, येथे दोन्ही संघांमध्ये एकूण पाच सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारताने एक जिंकला आहे तर न्यूझीलंडने चार जिंकले आहेत. ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानाविषयी बोलताना, दोन्ही संघांमधील एकमेव टी -20 आंतरराष्ट्रीय सामना येथे जिंकला गेला, जो भारताने जिंकला.

वाचा-वर्ल्ड कपमधल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी उतरणार भारत? विराटनं सांगितला प्लॅन

भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, मनीष पांडे, ऋषभ पंत, संजु सॅमसन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर.

वाचा-IPL 2020मध्ये शुभमन गील होणार KKRचा कर्णधार? शाहरुखनं केला खुलासा

न्यूजीलंड: केन विलय्मसन (कर्णधार) , मार्टिन गुप्टिल, रॉस टेलर, स्कॉट कजेलेजिन, कॉलिन मुनरो, कॉलिन डी ग्रैंडहोम, टॉम ब्रूस, डेरिल मिशेल, मिशेल सेंटनेर, टिम सीफर्ट , हामिश बेनेट, ईश सोढ़ी, टिम साउदी, ब्लेयर टिकनेर.

First published: January 24, 2020, 10:48 AM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या