टीम इंडियाला 'डबल' दणका! विराटच्या एका चुकीमुळे खेळाडूंना मिळणार नाहीत पूर्ण पैसे

टीम इंडियाला 'डबल' दणका! विराटच्या एका चुकीमुळे खेळाडूंना मिळणार नाहीत पूर्ण पैसे

कॅप्टन कोहलीला डबल दणका! लाजीरवाण्या पराभवानंतर संघाला बसला 80% दंड.

  • Share this:

हॅमिल्टन, 06 फेब्रुवारी : भारत-न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना बुधवारी हेमिल्टन येथे झाला. या सामन्यात भारताला 4 विकेटनं पराभव सहन करावा लागला. या पराभवासह न्यूझीलंडने भारताचा विजयी रथ रोखला. मात्र टीम इंडियाला या पराभवासह धिम्या गतीने ओव्हर टाकल्यामुळं शिक्षा मिळाली आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या मॅच फिवर 80% दंड आकारला जाणार आहे.

हॅमिल्टनमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं धिम्या गतीने षटके टाकली. आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार सलग तिसऱ्यांदा भारतीय संघाला धिम्या गतीने षटके टाकल्याचा फटका बसला आहे. याआधी भारतीय संघाचे चौथ्या आणि पाचव्या टी-20 सामन्यात धिम्या गतीने षटके टाकली होती.

वाचा-विराटने ज्या मुंबईकराला संघाबाहेर काढलं त्यानेच रचला इतिहास! 605 धावा केल्यानंतर

वाचा-जगभरातील संघांनी ओळखला विराटचा 'हा' वीक पॉईंट, टीम इंडियाची डोकेदुखी वाढली!

वाचा-2007 नंतर पुन्हा केलेली मोठी चूक टीम इंडियाला भोवली, भारताच्या पराभवाचं कारण

वाचा-विराटचा थ्रो पाहून जॉन्टी ऱ्होड्सला विसराल, VIDEO एकदा बघाच

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, मॅच रेफ्री क्रिस ब्रॉड यांनी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने दिलेल्या वेळेत षटके पूर्ण न केल्यामुळं हा दंड बसला आहे. भारतीय संघाने दिलेल्या वेळेत चार ओव्हर कमी टाकल्या मैदानावरील अम्पायर शॉन हेग आणि लांगटन रुसेरे यांनी टीम इंडियावर हे आरोप लगावले आहेत. त्यामुळं आयसीसी आचार संहिता अनुच्छेद 2.22नुसार प्रति ओव्हरनुसार 20% दंड आकारला जातो. दरम्यान कोहलीने आपली चूक मान्य केली असून, टीम इंडियाच्या मॅच फीमधून हे पैसे कापले जाणार आहेत.

First published: February 6, 2020, 8:44 AM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या