मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : टीम इंडियानं अश्विन ऐवजी इशांतची निवड का केली? विराटनं सांगितलं कारण

IND vs ENG : टीम इंडियानं अश्विन ऐवजी इशांतची निवड का केली? विराटनं सांगितलं कारण

विराटचा तो निर्णय टीम इंडियाला महागात पडणार

विराटचा तो निर्णय टीम इंडियाला महागात पडणार

शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) जखमी असल्यानं लॉर्ड्स टेस्ट खेळणार नाही हे बुधवारीच स्पष्ट झाले होते. शार्दुलच्या जागेवर इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि आर. अश्विन (R. Ashwin) या अनुभवी बॉलरमध्ये स्पर्धा होती

  • Published by:  News18 Desk

लॉर्ड्स, 12 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स टेस्टमध्ये (India vs England Lords Test) टीम इंडियामध्ये एक बदल करण्यात आला आहे.  जखमी शार्दुल ठाकूरच्या (Shardul Thakur) जागी इशांत शर्माचा (Ishant Sharma) समावेश करण्यात आला आहे. शार्दुल ठाकूर जखमी असल्यानं लॉर्ड्स टेस्ट खेळणार नाही हे बुधवारीच स्पष्ट झाले होते. शार्दुलच्या जागेवर इशांत शर्मा आणि आर. अश्विन (R. Ashwin) या अनुभवी बॉलरमध्ये स्पर्धा होती. टीम इंडियानं अश्विनच्या ऐवजी इशांत शर्माची निवड का केली ? याचं उत्तर कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) टॉसच्या वेळी दिले.

काय म्हणाला विराट?

विराट टॉस हरल्यानंतर म्हणाला की, 'आम्ही अंतर्गत 12 जणांची टीम जाहीर केली होती. त्या 12 जणांच्या टीममध्ये अश्विनचा समावेश होता. पण पिच आणि वातावरण पाहिल्यानंतर या टेस्टमध्ये चार फास्ट बॉलर्सना खेळवणे हा आक्रमक आहे. असे आमचे मत झाले,' असे विराटने स्पष्ट केले.

विराटनं यापूर्वीच शार्दुलचा पर्याय शोधताना बॅटींग कौशल्याचा विचार करणार नसल्याचं स्पष्ट केले होते. 'आम्हाला आपली जबाबदारी पूर्ण करणारे खेळाडू हवे आहेत. ते आमचे मुख्य लक्ष्य आहे. टीममधील प्रत्येकाला त्याचे योगदान देण्याची इच्छा आहे.' असे विराटने सांगितले होते.

इंग्लंडनं टॉस जिंकला

लॉर्ड्स टेस्टमध्ये इंग्लंडचा कॅप्टन जो रुटनं (Joe Root) टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. या टेस्टसाठी इंग्लंडनं तीन बदल केले आहेत. मोईन अली, मार्क वूड आणि हसीब अहमद यांचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. इंग्लंडचा अनुभवी फास्ट बॉलर स्टुअर्ट ब्रॉडला दुखापतीमुळे टीममधून वगळण्यात आलंय. तर सर्वात यशस्वी बॉलर जेम्स अँडरसन फिट असल्यानं त्याचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय.

IND vs ENG : विराट कोहलीच्या टीकाकारांना जडेजानं दिलं चोख उत्तर, म्हणाला...

टीम इंडिया : केएल राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज

इंग्लंड : रॉरी बर्न्स, डॉम सिब्ले, हसीब हमीद, जो रुट, जोनी बेअरस्टो, जोस बटलर,  मोईन अली, सॅम करन, ओली रॉबिन्सन, मार्क वूड आणि जेम्स अँडरसन

First published:

Tags: Cricket, India vs england, Virat kohli