मुंबई, 3 ऑगस्ट : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखला जातो. इशाऱ्या इशाऱ्यांमध्येच युवराज सिंगने इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी टीम इंडियाच्या (India vs England) रणनितीवर प्रश्न उपस्थित केले. भारतीय टीम इंग्लंडमध्ये फास्ट बॉलर घेऊन गेली, पण भुवनेश्वर कुमारसारखा (Bhuvneshwar Kumar) स्विंग बॉलर तिकडे गेला नाही, असं युवराज म्हणाला. भुवनेश्वरसारखा बॉलर इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये खेळायला पाहिजे होता, कारण तिकडे स्विंग बॉलर जास्त यशस्वी ठरतो, असं युवराजने सांगितलं.
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये युवराज म्हणाला, 'आपल्याकडे बरेच मॅच विनर खेळाडू आहेत, पण इंग्लंडमधली परिस्थिती खूप कठीण आहे. मला वाटतं भारताला इंग्लंडमध्ये स्विंग बॉलरची गरज आहे. ड्युक बॉल स्विंग होते, हे त्यांना माहिती पाहिजे. तुमच्याकडे फास्ट बॉलर आहेत. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा पण भुवनेश्वर कुमारसारख्या बॉलरची गरज आहे.'
'भुवनेश्वरकडे इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. तसंच तो बॉल स्विंग करतो. जर तो फिट असेल तर त्याला टीम इंडियासोबत इंग्लंडमध्ये असायला हवं,' असं वक्तव्य युवराजने केलं.
भारतीय टीमची निवड झाली तेव्हा भुवनेश्वर कुमारचं नाव नसल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. भुवी टेस्ट क्रिकेटसाठी फिट नसल्याचं वृत्त तेव्हा आलं होतं. भुवनेश्वरने इंग्लंडमध्ये 5 टेस्ट खेळून 19 विकेट आपल्या नावावर केल्या, यात दोन वेळा इनिंगमध्ये 5 विकेटचा समावेश आहे. 2014 लॉर्ड्स टेस्टमध्ये त्याने 82 रन देऊन 6 विकेट घेतल्या होत्या. टेस्ट क्रिकेटमधली भुवीची ही सर्वोत्तम कामगिरी होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs england, Virat kohli, Yuvraj singh