Home /News /sport /

IND vs ENG : Match draw झाली तरी जिंकणार एक टीम, जाणून घ्या नवा नियम

IND vs ENG : Match draw झाली तरी जिंकणार एक टीम, जाणून घ्या नवा नियम

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या वनडे सीरिजला सुरूवात झाली आहे. टेस्ट आणि टी-20 सीरिजनंतर टीम इंडियाचं लक्ष्य वनडे सीरिज (ODI Series) जिंकण्यावर असेल. ही सीरिज वर्ल्ड कप सुपर लीग (World Cup Super League) चा भाग आहे.

पुढे वाचा ...
    पुणे, 23 मार्च : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या वनडे सीरिजला सुरूवात झाली आहे. टेस्ट आणि टी-20 सीरिजनंतर टीम इंडियाचं लक्ष्य वनडे सीरिज (ODI Series) जिंकण्यावर असेल. ही सीरिज वर्ल्ड कप सुपर लीग (World Cup Super League) चा भाग आहे. त्यामुळे जर एखादी मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर (Super Over) होईल. सुपर ओव्हरमध्येही दोन्ही टीम बरोबरीत असल्या तर निकाल लागेपर्यंत सुपर ओव्हर खेळवली जाईल. वनडे क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंडमध्ये 9-9 मॅच टाय झाल्या आहेत. याआधी द्विपक्षीय सीरिजमध्ये मॅच टाय झाली तरी सुपर ओव्हर खेळवली जायची नाही. आयसीसीने मागच्या वर्षी जुलै महिन्यात वर्ल्ड कप सुपर लीगची सुरूवात केली. यामध्ये 13 टीमचा समावेश केला गेला आहे. या टीमना 8 टीमविरुद्ध सीरिज खेळावी लागणार आहे. यातल्या 4 सीरिज घरच्या मैदानात आणि 4 परदेशात खेळाव्या लागणार आहेत. प्रत्येक सीरिजमध्ये 3 मॅच असतील, म्हणजेच प्रत्येक टीम 24 वनडे मॅच खेळणार आहेत. प्रत्येक मॅचसाठी 10 पॉईंट्स आहेत. वनडेमध्ये द्विपक्षीय सीरिजमध्ये मॅच टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर खेळवली जायची नाही, पण ही सीरिज आयसीसी वर्ल्ड कप सुपर लीगचा भाग आहे, त्यामुळे मॅच टाय झाली तर निकाल लागेपर्यंत सुपर ओव्हर खेळवली जाईल. 2019 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये सुपर ओव्हरही टाय झाली होती, त्यामुळे बाऊंड्रीच्या नियमांवरून इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं. इंग्लंडला विजयी घोषित केल्यानंतर आयसीसीच्या या नियमांवर जोरदार टीका करण्यात आली होती. यानंतर आयसीसीने हा नियम बदलला. वर्ल्ड कप सुपर लीगमध्ये भारताने आतापर्यंत एकच सीरिज खेळली आहे. मागच्यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये तीन मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा 2-1 ने पराभव झाला होता. यानंतर आता इंग्लंडविरुद्ध भारत दुसरी सीरिज खेळत आहे. ऑस्ट्रेलिया टॉपवर वर्ल्ड कप सुपर लीगमध्ये टॉप-8 मधल्या टीम 2023 वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेश मिळवतील. तर उरलेल्या 5 टीमना क्वालिफिकेशन स्पर्धा खेळावी लागेल. लीगच्या पॉईंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया 40 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. तर बांगलादेश दुसऱ्या इंग्लंड तिसऱ्या अफगाणिस्तान चौथ्या आणि वेस्ट इंडिज पाचव्या क्रमांकावर आहे. टीम इंडिया 9 पॉईंट्ससह 10व्या क्रमांकावर आहे. जर भारताने इंग्लंडविरुद्धची सीरिज 3-0ने जिंकली, तर त्यांच्या खात्यात 39 पॉईंट्स होतील आणि टॉप-3 मध्ये जागा मिळेल. सध्या बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातही वनडे सीरिज सुरू आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket news, India vs england, Sports

    पुढील बातम्या