मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : विराट-शास्त्री निवड समितीच्या वरचढ! 'अनफिट' खेळाडूची मागणी

IND vs ENG : विराट-शास्त्री निवड समितीच्या वरचढ! 'अनफिट' खेळाडूची मागणी

विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडिया 4 ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध (India vs England) टेस्ट सीरिज खेळणार आहे. भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (World Test Championship) नव्या मोसमाला या सीरिजपासूनच सुरुवात होत आहे, त्यामुळेही याला महत्त्व प्राप्त झालं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

लंडन, 3 जुलै : विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडिया 4 ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध (India vs England) टेस्ट सीरिज खेळणार आहे. भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (World Test Championship) नव्या मोसमाला या सीरिजपासूनच सुरुवात होत आहे, त्यामुळेही याला महत्त्व प्राप्त झालं आहे. इंग्लंडविरुद्धच्या या सीरिजआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार टीम प्रशासन गिलऐवजी (Shubhaman Gill) पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) इंग्लंडमध्ये बोलावण्यासाठी आग्रही आहे.

निवड समितीने याआधी इंग्लंड दौरा आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी टीम निवडली होती, तेव्हा पृथ्वी शॉला संधी देण्यात आली नव्हती. 21 वर्षांच्या पृथ्वी शॉचं वजन जास्त आहे, त्यामुळे त्याची निवड केली गेली नसल्याचं सांगण्यात आलं. सोबतच त्याला वजन कमी करण्याचाही सल्ला देण्यात आल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. जर पृथ्वी शॉचं वजन जास्त असल्यामुळे त्याला सुरुवातीला वगळण्यात आलं होतं, मग आता त्याची मागणी का केली जात आहे? विराट कोहली आणि रवी शास्त्री (Ravi Shastri) ही मागणी करत असतील, तर ते निवड समितीवर वरचढ ठरत आहेत का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

खेळाडूंचं मनोबल खच्ची होणार?

टीमसोबत सध्या ओपनर म्हणून मयंक अग्रवाल (Mayank Agarwal), केएल राहुल (KL Rahul) यांच्याशिवाय स्टॅण्डबाय खेळाडू असलेला अभिमन्यू इश्वरन (Abhimanyu Iswaran) आहे. या तीन खेळाडूंना बाहेर ठेवून जर पृथ्वी शॉला टीममध्ये घेतलं, तर त्यांचं मनोबल खच्ची होण्याची शक्यता आहे. ओपनर म्हणून मयंक अग्रवालने 13 टेस्टच्या 21 इनिंगमध्ये 48 च्या सरासरीने 1005 रन केले आहेत. तर केएल राहुलने 33 टेस्टमध्ये 54 इनिंग खेळून 1915 रन केले. अभिमन्यू इश्वरनला अजून पदार्पणाची संधी मिळालेली नाही.

पृथ्वी शॉ श्रीलंकेत

टीम इंडियाचा ओपनर पृथ्वी शॉ हा सध्या श्रीलंकेत आहे. भारताचे महत्त्वाचे खेळाडू इंग्लंडमध्ये असल्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी (India vs Sri Lanka) नवोदितांना संधी देण्यात आली आहे. जर पृथ्वी शॉची इंग्लंडमधल्या टीममध्ये निवड झाली तर त्याला श्रीलंकेतून थेट इंग्लंडला जावं लागेल. श्रीलंकेमध्ये भारतीय टीम 3 वनडे आणि 3 टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. 13 जुलै ते 25 जुलैपर्यंत ही सीरिज चालेल.

टीम इंडियाची खराब कामगिरी

इंग्लंडमध्ये टीम इंडियाने एकूण 63 टेस्ट खेळल्या, यातल्या 35 टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला, तर फक्त 7 टेस्ट जिंकता आल्या. 21 टेस्ट मॅच ड्रॉ राहिल्या. 2018 साली भारतीय टीमचा शेवटचा इंग्लंड दौरा झाला. या दौऱ्यात विराटच्या नेतृत्वात टीमचा 4-1 ने पराभव झाला. यावेळी टीम इंडिया आणि विराट कोहली त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरतील.

First published:

Tags: India vs england, Prithvi Shaw, Ravi shastri, Team india, Virat kohli