Home /News /sport /

IND vs ENG : विराटचा एक निर्णय, बड्या खेळाडूंसाठी ठरणार धोका

IND vs ENG : विराटचा एक निर्णय, बड्या खेळाडूंसाठी ठरणार धोका

इंग्लंडविरुद्धच्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये टीम इंडियाचा (India vs England) कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) अनेक प्रयोग केले. पाचव्या टी-20 मॅचमध्ये तर विराट स्वत: ओपनिंगला उतरला आणि नाबाद 80 रनची शानदार इनिंग खेळून गेला.

    अहमदाबाद, 21 मार्च : इंग्लंडविरुद्धच्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये टीम इंडियाचा (India vs England) कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) अनेक प्रयोग केले. पाचव्या टी-20 मॅचमध्ये तर विराट स्वत: ओपनिंगला उतरला आणि नाबाद 80 रनची शानदार इनिंग खेळून गेला. विराटच्या या खेळीमुळे भारताने इंग्लंडचा पराभव करत टी-20 सीरिजवरही 3-2 ने कब्जा केला. आपण भविष्यातही रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) ओपनिंगला खेळू, असं विराटने मॅचनंतर सांगितलं. विराटने हा निर्णय घेतला तर टीममधल्या इतर बड्या खेळाडूंचं काय होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) आता फक्त 7 महिने झाले आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ही स्पर्धा भारतात होणार आहे. आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या मोसमातही रोहित ओपनिंगला खेळणार आहे. याआधीही त्याने आयपीएलमध्ये ओपनिंगला बॅटिंग केली. 9 एप्रिलपासून यंदाच्या आयपीएलला सुरूवात होणार आहे. जर कोहली या मोसमात ओपनिंगला यशस्वी ठरला तर वर्ल्ड कपमध्येही तोच या क्रमांकावर बॅटिंग करू शकतो. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजच्या पहिल्या 4 मॅचमध्ये ओपनिंग जोडी खास कामगिरी करू शकली नाही. या 4 मॅचमध्ये सर्वाधिक ओपनिंग पार्टनरशीप 21 रनची होती. पण शेवटच्या सामन्यात रोहित-विराटच्या जोडीने 94 रनची खेळी केली, त्यामुळे या मॅचमध्ये भारताने 20 ओव्हरमध्ये 224 रनपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला 20 ओव्हरमध्ये 188 रनच करता आले, त्यामुळे भारताने हा सामना 36 रनने जिंकला. धवन-राहुलचं काय होणार? शिखर धवनला (Shikhar Dhawan) इंग्लंडविरुद्ध फक्त एकच मॅच खेळायची संधी मिळाली, तर राहुल (KL Rahul) 4 वेळा मैदानात उतरला. या दोघांचा टी-20 क्रिकेटमधला ओपनिंगचा रेकॉर्डही चांगला नाही. त्यामुळे कोहली जर ओपनिंगला आला, तर या दोन खेळाडूंचं काय? असा प्रश्न उपस्थित होते. राहुल खालच्या क्रमांकावर बॅटिंग करू शकतो, पण तिकडेही सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, इशान किशन यांच्यासारखे खेळाडू उपस्थित आहेत. इशान किशनने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये ओपनिंगला खेळून अर्धशतक केलं होतं, त्यामुळे आता तोदेखील ओपनरच्या रेसमध्ये आहे. विराटची ओपनिंग विराट कोहलीने 8 वेळा 5 वेगवेगळ्या खेळाडूंसोबत टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये ओपनिंग केली. यात सर्वाधिक 4 वेळा तो राहुलसोबत मैदानात उतरला, तेव्हा त्याने 23 च्या सरासरीने 94 रनची पार्टनरशीप केली. तर रोहितसोबत त्याने एका मॅचमध्ये 94 रन आणि शिखऱसोबत एका इनिंगमध्ये 64 नची पार्टनरशीप केली. याशिवाय विराट गौतम गंभीर आणि मुरली विजयसोबतही ओपनिंगला खेळला तेव्हा 26 रन आणि 18 रनची पार्टनरशीप झाली. ओपनर म्हणून विराटने 8 इनिंगमध्ये 278 रन केले, यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. विराटने या रन 149 च्या स्ट्राईक रेटने केल्या. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट पहिल्या आणि रोहित दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन आणि सुनील गावसकर यांनीही रोहित-विराटच्या जोडीने ओपनिंग करावी, असं मत मांडलं आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england, Kl rahul, Rohit sharma, Shikhar dhawan, Virat kohli

    पुढील बातम्या