डरहम, 20 जुलै: टीम इंडिया इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी (India vs England) काऊंटी टीमविरुद्ध सराव सामना (Practice Match) खेळत आहे. मंगळवारपासून या तीन दिवसांच्या सामन्याला सुरुवात झाली, पण टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने या मॅचमधून माघार घेतली आहे. विराटऐवजी रोहित शर्माकडे (Rohit Sharma) टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे. टीम इंडिया 23 जूनला संपलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर (WTC Final) पहिल्यांदाच मॅच खेळण्यासाठी मैदानात उतरली आहे. फायनलनंतर खेळाडूंना 20 दिवसांचा ब्रेक देण्यात आला होता. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. सराव सामन्यामध्ये टीम इंडियाने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.
विराट कोहलीशिवाय अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा, आर.अश्विन आणि मोहम्मद शमी यांनाही या सामन्यासाठी आराम देण्यात आला आहे. रोहित शर्मासोबत मयंक अग्रवाल ओपनिंग करत आहे. तर विकेट कीपर म्हणून केएल राहुल खेळेल. फास्ट बॉलर्समध्ये शार्दुल ठाकूर, उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना संधी देण्यात आली आहे. केएल राहुल या सामन्यात चांगली कामगिरी करून टेस्ट टीममध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल.
दुखापतीमुळे टीमचा ओपनर शुभमन गिल (Shubhaman Gill) आधीच बाहेर झाला आहे, त्यामुळे पहिल्या टेस्टमध्ये रोहितबरोबर मयंक अग्रवाल ओपनिंगला खेळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे केएल राहुलने (KL Rahul) बहुतेक टेस्टमध्ये ओपनिंगलाच बॅटिंग केली आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये राहुलने आतापर्यंत 2 हजार रन केले आहेत.
विराट कोहलीला पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) फॉर्मचीही चिंता आहे, त्यामुळे केएल राहुलचा मधल्या फळीसाठीही विचार होऊ शकतो
सराव सामन्यासाठी भारतीय टीम
रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, केएल राहुल (विकेट कीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs england, Virat kohli