IND vs ENG : विराट पुन्हा फेल, 467 दिवसानंतरही या रेकॉर्डच्या प्रतिक्षेत

IND vs ENG : विराट पुन्हा फेल, 467 दिवसानंतरही या रेकॉर्डच्या प्रतिक्षेत

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या टेस्टमध्ये कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा अपयशी ठरला आहे.

  • Share this:

अहमदाबाद, 5 मार्च : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या टेस्टमध्ये कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा अपयशी ठरला आहे. 8 बॉलमध्ये शून्य रन करून विराट आऊट झाला. बेन स्टोक्सने विराटला माघारी धाडलं. आज पुन्हा एकदा फेल गेल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉण्टिंगचं (Ricky Pointing) रेकॉर्ड अजूनही प्रतिक्षेत राहिलं. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 70 शतकं केली आहेत, यातली 41 शतकं कर्णधार असतानाची आहेत. कर्णधार असताना सर्वाधिक शतकं करणाऱ्यांमध्ये विराट आणि रिकी पॉण्टिंग बरोबरीत आहेत. मागच्या 467 दिवसांपासून हीच परिस्थिती कायम आहे. या कालावधीत विराटने 36 इनिंग खेळल्या, पण त्याला शतक करता आलं नाही.

विराट कोहलीने शेवटचं शतक 22 नोव्हेंबर 2019 साली बांगलादेशविरुद्ध केलं. ते शतक विराटचं करियरमधलं 70 वं आणि कर्णधार म्हणून 41वं होतं. यानंतर विराट 11 टेस्ट आणि वनडे, टी-20 मध्ये प्रत्येकी 12-12 इनिंग खेळला. यात एकदा तो 94 रनवर नाबादही राहिला, पण 71 वं शतक मात्र त्याला हुलकावणी देत आहे.

विराट कोहलीच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये 27 शतकं आहेत. स्टीव्ह स्मिथ, ग्रॅम स्मिथ आणि एलन बॉर्डर यांनीही टेस्ट क्रिकेटमध्ये एवढीच शतकं केली आहेत. दुसऱ्या इनिंगमध्ये विराटला शतक करता आलं तर हे त्याचं टेस्ट क्रिकेटमधलं 28 वं शतक ठरेल. टेस्टमध्ये 28 किंवा त्यापेक्षा जास्त शतकं करणारे फक्त 16 बॅट्समन आहेत.

विराटला शतक करण्यात यश आलं, तर तो सर्वाधिक रन करणाऱ्या गॉर्डन ग्रिनीज, स्टीव्ह स्मिथ, मोहम्मद युसूफ, मार्क टेलर आणि क्लाईव्ह लॉईड यांना मागे टाकेल. विराटच्या नावावर सध्या 7,490 रन आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 तर रिकी पॉण्टिंगने 71 शतकं केली आहेत. दुसऱ्या इनिंगमध्ये विराटला शतक करता आलं, तर तो सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पॉण्टिंगची बरोबरी करेल.

Published by: Shreyas
First published: March 5, 2021, 2:19 PM IST

ताज्या बातम्या