मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : बुमराहची जागा घेण्यासाठी 3 फास्ट बॉलर तयार, विराट संधी देणार?

IND vs ENG : बुमराहची जागा घेण्यासाठी 3 फास्ट बॉलर तयार, विराट संधी देणार?

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा सध्या भारतीय टीममधला सगळ्यात मोठा मॅच विनर खेळाडू आहे, याबाबत कोणाच्याच मनात शंका नसेल. पण सध्या बुमराह खराब फॉर्ममध्ये आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) फास्ट बॉलरना मदत होत असलेली खेळपट्टी आणि हवामान असूनही बुमराहला दोन्ही इनिंगमध्ये एकही विकेट मिळाली नाही.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 30 जून : जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा सध्या भारतीय टीममधला सगळ्यात मोठा मॅच विनर खेळाडू आहे, याबाबत कोणाच्याच मनात शंका नसेल. पण सध्या बुमराह खराब फॉर्ममध्ये आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) फास्ट बॉलरना मदत होत असलेली खेळपट्टी आणि हवामान असूनही बुमराहला दोन्ही इनिंगमध्ये एकही विकेट मिळाली नाही. एवढच नाही तर तो दोन्ही इनिंगमध्ये शून्य रनवर आऊट झाला आणि त्याला संपूर्ण सामन्यात एकही कॅच पकडता आला नाही. बुमराहचा खराब फॉर्म टीम इंडियाच्या पराभवाचं एक प्रमुख कारण ठरला.

न्यूझीलंडनंतरच्या या सामन्यानंतर आता भारतापुढे इंग्लंडचं (India vs England) आव्हान आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या सीरिजमध्ये बुमराहला फॉर्म गवसला नाही, तर दुसऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची पहिली सीरिजही भारताच्या हातातून जाऊ शकते. बुमराहचा असाच संघर्ष सुरु राहिला तर विराट कोहलीकडे (Virat Kohli) त्याच्याऐवजी तीन पर्याय आहेत.

मोहम्मद सिराज

टीम इंडियाकडे मोहम्मद सिराजच्या (Mohammad Siraj) रुपात फॉर्ममध्ये असलेला फास्ट बॉलर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये सिराज टीम इंडियाचा सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर होता. सिराजने ऑस्ट्रेलियाच्या सगळ्या बॅट्समनच्या मनात भीती निर्माण केली होती, असं डेव्हिड वॉर्नर काहीच दिवसांपूर्वी म्हणाला होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशनशीपच्य फायनलमध्ये सिराजऐवजी इशांत शर्माला (Ishant Sharma) संधी देण्यात आली होती. आता इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये त्याला खेळवलं जाऊ शकतं. नव्या बॉलसोबतच सिराज जुन्या बॉलनेही विकेट घेऊ शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 टेस्टमध्ये त्याला 16 विकेट मिळाल्या होत्या. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने इनिंगमध्ये 5 विकेट घेण्याचा विक्रम केला होता.

शार्दुल ठाकूर

वनडे आणि टी-20 मध्ये शार्दुल (Shardul Thakur) महागडा ठरत असला तरी मोक्याच्या क्षणी विकेट घेण्याची क्षमता त्याच्यात आहे. लाल बॉलने तो आणखी प्रभावशाली ठरू शकतो कारण त्याच्याकडे स्विंग आहे. इंग्लंडमधलं वातावरणही शार्दुलला बॉल स्विंग करण्यासाठी मदत करेल. एवढच नाही तर तो खालच्या फळीत चांगली बॅटिंगही करू शकतो, हे त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये दाखवून दिलं.

उमेश यादव

उमेश यादव (Umesh Yadav) हा बऱ्याच काळापासून भारतीय टीममध्ये आहे, पण त्याला अंतिम-11 मध्ये खेळण्याची संधी फार कमी वेळा मिळाली आहे. 48 टेस्टमध्ये 148 विकेट घेतलेल्या उमेशकडे अनुभवासोबतच वेगही आहे, त्यामुळे विराट त्याचाही विचार करू शकतो.

First published:

Tags: Cricket, India vs england, Jasprit bumrah, Team india, Virat kohli