Home /News /sport /

IND vs ENG : इंग्लंडमधून टीम इंडियाला आणखी दोन मोठे धक्के, दिग्गजांना दुखापत

IND vs ENG : इंग्लंडमधून टीम इंडियाला आणखी दोन मोठे धक्के, दिग्गजांना दुखापत

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला (India vs England) दोन मोठे धक्के बसले आहेत. दुखापतीमुळे विराट कोहली (Virat Kohli) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सराव सामन्यात खेळू शकले नाहीत.

    डरहम, 20 जुलै : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला (India vs England) दोन मोठे धक्के बसले आहेत. पाठीच्या दुखापतीमुळे विराट कोहलीला (Virat Kohli) सराव सामन्यातून माघार घ्यायचा सल्ला देण्यात आला आहे, तर अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) हॅमस्ट्रिंगवर (गुडघ्याच्या मागच्या भागातील टिश्यू) वैद्यकीय टीम लक्ष ठेवून आहे. या कारणामुळे विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे सिलेक्ट काऊंटी इलेव्हनविरुद्धच्या सराव सामन्यासाठी मैदानात उतरले नाहीत. 4 ऑगस्टला भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी दोघांचं फिट होणं टीम इंडियासाठी गरजेचं आहे, कारण विराट-अजिंक्य भारताच्या टेस्ट टीमचे आधारस्तंभ आहेत. याआधी शुभमन गिलदेखील (Shubhaman Gill) पायाच्या दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमधून बाहेर झाला आहे. तर ऋषभ पंत (Rishabh Pant)  याला कोरोनाची लागण झाल्यामुळे तो सध्या आयसोलेशनमध्ये आहे. ऋद्धीमान साहानेदेखील (Wriddhiman Saha) कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्यामुळे स्वत:ला आयसोलेट करून घेतलं आहे. साहाची कोरोना टेस्ट मात्र निगेटिव्ह आली आहे. शुभमन गिल सीरिजमधून बाहेर झाल्यानंतर टीम इंडियाने निवड समितीकडे दोन नव्या ओपनरची मागणी केली होती. निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी मात्र याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही, त्यामुळे टीम आणि निवड समिती यांच्यात वाद असल्याचा चर्चाही झाल्या. इंग्लंडमध्ये ओपनर म्हणून टीम इंडियाच्या प्रशासनाला पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि देवदत्त पडिक्कल (Devdut Paddikal) हवे आहेत, असंही बोललं गेलं. इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी भारतीय टीम डरहममध्ये सराव सामना खेळत आहे. काऊंटी सिलेक्ट इलेव्हनच्या (County Select XI) बॉलिंगसमोर रोहित शर्मा (Rohit Sharma), मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara)लवकर आऊट झाले. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी टीम इंडियासाठी ही धोक्याची घंटा आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्येही टीम इंडियाचे बॅट्समन अपयशी ठरले होते. विराट कोहलीच्या गैरहजेरीत रोहित शर्माकडे टीम इंडियाचं नेतृत्व देण्यात आलं आहे. रोहितने सुरुवातीला सावध खेळ करण्याचा प्रयत्न केला, पण 9 रन करून तो आऊट झाला. मयंकला 28 रन, पुजाराला 21 रन आणि हनुमा विहारीला 24 रन करता आले. टेस्ट टीममध्ये पुनरागमन करण्यासाठी झगडत असणाऱ्या केएल राहुलने (KL Rahul) अर्धशतकी खेळी केली.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ajinkya rahane, Cricket, India vs england, Virat kohli

    पुढील बातम्या