मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : फिट होऊन मैदानात उतरताच विराटची तूफान फटकेबाजी, VIDEO

IND vs ENG : फिट होऊन मैदानात उतरताच विराटची तूफान फटकेबाजी, VIDEO

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी (India vs England) सुरू असलेल्या सराव सामन्यात खेळायला उतरला नाही, त्यावेळी वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या.

लंडन, 21 जुलै : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी (India vs England) सुरू असलेल्या सराव सामन्यात खेळायला उतरला नाही, त्यावेळी वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. विराट कोहलीला पाठदुखीचा त्रास होत असल्यामुळे तो मैदानात उतरला नसल्याचं नंतर स्पष्ट झालं, पण यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं टेन्शन वाढलं. 24 तासांमध्येच विराट कोहलीने चाहत्यांना दिलासा दिला. विराट आता पूर्णपणे फिट असून तो मैदानात सरावासाठी उतरला.

कोहलीने नेट प्रॅक्टिसमध्ये कव्हर ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह आणि रिव्हर्स स्वीप शॉटही मारला. बीसीसीआयने (BCCI) विराट कोहलीच्या बॅटिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. टेस्ट सीरिजमध्येही विराट कोहली असाच खेळेल, अशी अपेक्षा चाहत्यांनी या व्हिडिओच्या कमेंटमध्ये व्यक्त केली आहे.

विराट कोहलीला मागच्या दोन वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय शतक करता आलेलं नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्येही (WTC Final) विराट कोहली अपयशी ठरला, तसंच भारताने हा सामना गमावल्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं.

विराट सध्याचा जगातला सर्वोत्तम बॅट्समन असला तरी त्याची इंग्लंडमधली कामगिरी निराशाजनक राहिली आहे. इंग्लंडमध्ये त्याने 11 मॅचमध्ये 35.63 च्या सरासरीने 784 रन केले. तसंच त्याच्या करियरची सरासरी 52.04 आहे. मागच्या इंग्लंड दौऱ्यात विराटने आपल्या बॅटची धमक दाखवली होती. 5 टेस्टमध्ये त्याने 59.30 च्या सरासरीने 593 रन केले, यात 2 शतकं आणि 3 अर्धशतकांचा समावेश होता. विराटच्या या कामगिरीनंतरही भारताने ही सीरिज गमावली होती.

First published:
top videos

    Tags: India vs england, Virat kohli