मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : टीम इंडियाने मालिका जिंकली, पण हा भारतीय खरा 'मॅन ऑफ द सीरिज'

IND vs ENG : टीम इंडियाने मालिका जिंकली, पण हा भारतीय खरा 'मॅन ऑफ द सीरिज'

इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये (India vs England) टीम इंडियाचा विजय झाला. यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सीरिज पुरस्कारावरून नाराजी व्यक्त केली. विराटच्या या नाराजीनंतर सोशल मीडियावर अंपायर नितीन मेनन (Umpire Nitin Menon) हेच खरे मॅन ऑफ द सीरिज असल्याचं बोललं जाऊ लागलं.

पुढे वाचा ...

पुणे, 29 मार्च : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा (India vs England) 7 रनने विजय झाला, याचसोबत भारताने वनडे सीरिजही 2-1 ने जिंकली. याआधी झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये भारताचा 3-1 ने आणि टी-20 सीरिजमध्ये 3-2 ने विजय झाला होता. टॉस जिंकून इंग्लंडने पहिले बॅटिंगला बोलावल्यानंतर भारताचा 48.2 ओव्हरमध्ये 329 रनवर ऑल आऊट झाला. ऋषभ पंतने 62 बॉलमध्ये सर्वाधिक 78 रन केले. तर शिखर धवनने 67 आणि हार्दिक पांड्याने 64 रनची खेळी करून भारताचा स्कोअर 300 रनच्या पुढे पोहोचवला.

भारताच्या या आव्हानाचा पाठलाग करताना आठव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या सॅम करनने संघर्ष करत नाबाद 95 रनची खेळी केली, पण तरीही इंग्लंडला विजय मिळवता आला नाही.

या मॅचनंतर देण्यात आलेल्या मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सीरिजनंतर विराट कोहलीने (Virat Kohli) उघड नाराजी व्यक्त केली. वन-डे सीरिजच्या शेवटच्या मॅचमध्ये सॅम करनला (Sam Curran) 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कारानं गौरवण्यात आले. तर 'मॅन ऑफ द सीरिज' पुरस्कारासाठी जॉनी बेअरस्टोची (Jonny Bairstow) निवड झाली. या पुरस्करांसाठी अनुक्रमे शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) यांची निवड व्हाययला हवी होती, असे मत विराटनं मॅच संपल्यानंतर व्यक्त केले.

एकीकडे विराट कोहलीने मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सीरिजसाठी नावं घेतली असताना सोशल मीडियावर मात्र भारतीय क्रिकेट चाहते प्रकाशझोतात न आलेल्या भारतीयाचं नाव घेत आहेत. या सीरिजमध्ये नितीन मेनन (Nitin Menon) यांनी केलेल्या अंपायरिंगवर क्रिकेट चाहते फिदा झाले आहेत.

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तिन्ही सीरिजमध्ये डीआरएसचा अंपायर्स कॉल आणि सॉफ्ट सिग्नलवरून बरेच वाद झाले, पण अंपायर नितीन मेनन यांनी दिलेले अचूक निर्णय चर्चेचा विषय झाला आहे. सुनिल गावसकर आणि आकाश चोप्रा यांनीही कॉमेंट्री करताना नितीन मेनन यांचं कौतुक केलं आहे. नितीन मेनन हे आयसीसीच्या एलीट पॅनलमध्ये असलेले सगळ्यात तरुण भारतीय अंपायर बनले आहेत.

भारत-इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या वनडेमध्ये कृणाल पांड्याने टाकलेला बॉल डेव्हिड मलानच्या पॅडला लागला, यानंतर भारतीय खेळाडूंनी जोरदार अपील केलं, पण मेनन यांनी मलानला नॉट आऊट दिलं. यानंतर टीम इंडियाला मलान आऊट आहे, असं वाटत असल्यामुळे त्यांनी डीआरएस घेतला. यानंतर पहिल्या दोन रिप्लेनंतर मलान आऊट असल्याचं वाटत होतं, पण तिसऱ्या रिप्लेमध्ये तो नॉट आऊट असल्याचं स्पष्ट झालं आणि टीम इंडियासह अनेकांना आश्चर्य वाटलं. बॉल स्टम्पला लागत नसल्याचं रिप्लेमध्ये दिसल्यानंतर अनेकांनी मेनन यांचं कौतुक केलं.

First published:

Tags: Cricket news, India vs england, Virat kohli