• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND Vs ENG T20 Series: गुजरातमध्ये वाढतोय कोरोना; अहमदाबादमधल्या शेवटच्या 3 सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

IND Vs ENG T20 Series: गुजरातमध्ये वाढतोय कोरोना; अहमदाबादमधल्या शेवटच्या 3 सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

महाराष्ट्राबरोबर गुजरातमध्येही कोरोनारुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे नाइलाजाने शेवटच्या तीन IND Vs ENG T20 सामन्यांसाठी गुजरात क्रिकेट असोसिएशनला (Gujarat cricket association) कठोर निर्णय घ्यावा लागला आहे.

 • Share this:
  अहमदाबाद, 15 मार्च: देशात कोरोना विषाणूचा (coronavirus update Gujarat) विळखा वाढतच चालला आहे. दिवसेंदिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. यामुळे देशात विविध भागात कोरोना विषाणूचे निर्बंध कठोर (Lockdown news) केले जात आहे. आता याचा परिणाम क्रिकेट खेळावर देखील होताना जाणवत आहे. सध्या भारत आणि इंग्लंड (IND Vs ENG T20) दरम्यान 5 सामन्यांची टी- 20 मालिका खेळवली जात आहे. यातील दुसरा सामाना रविवारी खेळवण्यात आला आहे. ज्यामध्ये भारताना इंग्लंडच्या 7 गडी राखून दारूण पराभव केला आहे. त्यामुळे या मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे (ahmedabad news) ही टी-20 मालिका अधिक चुरशीची बनत चालली आहे. त्यामुळे सामने पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींचा ओढा मैदानामध्ये उपस्थित राहून सामना पाहण्याकडे वाढला आहे. असं असताना क्रिकेट प्रेमींसाठी नकारात्मक बातमी समोर आली आहे. आता येथून पुढील सामाने प्रेक्षक विरहित खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशात कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेवून हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं आहे. हा निर्णय गुजरात क्रिकेट असोसिएशनने घेतला आहे. त्यामुळे अनेक क्रिकेट चाहत्यांचा हिरमूड झाला आहे. इशानच्या पहिल्या मॅचपूर्वी गर्लफ्रेंडनं चेहऱ्याला लावलं रक्त! वाचा, काय आहे कारण पुढील तिन्ही टी -20 सामन्यासाठी अनेकांनी तिकीटं खरेदी केली आहे. ज्या लोकांनी तिकिटं खरेदी केली आहेत. अशा लोकांचे तिकीटाचे पैसे परत मिळणार असल्याची माहितीही गुजरात क्रिकेट असोसिएशन दिली आहे. त्यामुळे भारत आणि इंग्लंड दरम्यान खेळवण्यात येणारे पुढील सर्व आंतरराष्ट्रीय सामने प्रेक्षक विरहित खेळवले जाणार आहे. पुढचे तीन टी-20 सामने अनुक्रमे 16, 18 आणि 20 मार्च रोजी खेळवले जाणार आहेत. हे सर्व सामने गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद याठिकाणी खेळवले जाणार आहेत. या सामन्यांसाठी ज्यांनी तिकीट खरेदी केली होती. त्यांचे पैसे परत दिले जातील, अशी माहिती गुजरात क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष धनराज नाठवनी यांनी दिली आहे. VIDEO : मॅच सुरू असताना अनपेक्षित हल्ला, खेळाडूंना घ्यावा लागला सुरक्षित आसरा! अहमदाबाद याठिकाणी कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता, महानगर पालिकेनं शहरातील आठ वॉर्डात रात्री 10 वाजता दुकानं बंद करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशात म्हटलं आहे की, या परिसरातील हॉटेल, मॉल, शोरूम,पान शॉप, क्लब, टी स्टॉल आणि सलून अशी सर्व दुकानं रात्री 10 च्या अगोदर बंद करणं अपेक्षित आहे. आज गुजरातमध्ये एकूण 890 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून गुजरातमधील कोरोनाचा आतापर्यंतचा आकडा 2,79,097 वर पोहचला आहे.
  First published: