अहमदाबाद, 24 फेब्रुवारी : भारताविरुद्धच्या तिसऱ्या पिंक बॉल टेस्टमध्ये इंग्लंड (India vs England)चा 112 रनवर ऑल आऊट झाला. मोटेरा स्टेडियमवरच्या या मॅचमध्ये इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पहिल्या टेस्ट प्रमाणेच या मॅचमध्येही पहिले बॅटिंग करून मोठा स्कोअर करण्याची रूटची अपेक्षा होती, पण भारतीय बॉलर्सनी इंग्लंडला बॅकफूटवर नेलं. जॅक क्राऊलीचं अर्धशतक (53 रन) सोडलं तर इंग्लंडच्या कोणत्याच बॅट्समनला मोठा स्कोअर करता आला नाही. इंग्लंडच्या सात बॅट्समनना तर दोन आकडी स्कोअरपर्यंतही मजल मारता आली नाही.
इंग्लंडची बॅटिंग सुरू असताना मैदानामध्ये मजेशीर घटना घडली. ऑल राऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) बॅटिंग करत असताना अश्विन (Ashwin) च्या हातात बॉल होता. अश्विनने बॉल टाकण्याची ऍक्शन केली, तेव्हा स्टोक्सने हात दाखवून त्याला थांबवलं. यानंतर विराट कोहली (Virat Kohli) स्टोक्सच्या जवळ आला आणि उगाच वेळ वाया घालवू नकोस, असं खडसावलं. विराट कोहलीचा हा आवाज स्टम्प मायक्रोफोनमध्ये कैद झाला. या घटनेनंतर स्टोक्स जास्तवेळा क्रीजवर टिकला नाही. 24 बॉलवर 6 रन करून स्टोक्स आऊट झाला. अक्षर पटेलने त्याची विकेट घेतली.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी टेस्ट महत्त्वाची
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या रेसमध्ये राहण्यासाठी ही टेस्ट जिंकणं दोन्ही टीमला गरजेचं आहे. न्यूझीलंडने आधीच फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसऱ्या स्थानासाठी भारत, इंग्लंड यांच्यात जोरदार चुरस आहे. चार टेस्टच्या या सीरिजमध्ये दोन्ही टीम एक-एकने बरोबरीत आहेत, त्यामुळे पिंक बॉल टेस्टमध्ये जी टीम जिंकेल ती फायनलच्या आणखी जवळ जाईल. पहिल्या इनिंगमधल्या भारतीय बॉलरच्या कामगिरीमुळे टीम इंडियाने या मॅचवरची आपली पकड आणखी मजबूत केली आहे.
Published by:Shreyas
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.