मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : रोहितने इतिहास घडवला, हा विक्रम करणारा जगातला फक्त तिसरा क्रिकेटपटू

IND vs ENG : रोहितने इतिहास घडवला, हा विक्रम करणारा जगातला फक्त तिसरा क्रिकेटपटू

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात मोटेरा स्टेडियममध्ये पिंक बॉल टेस्ट सुरू आहे. या मॅचमध्ये रोहित शर्माने (Rohit Sharma) इतिहास घडवला आहे.

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात मोटेरा स्टेडियममध्ये पिंक बॉल टेस्ट सुरू आहे. या मॅचमध्ये रोहित शर्माने (Rohit Sharma) इतिहास घडवला आहे.

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात मोटेरा स्टेडियममध्ये पिंक बॉल टेस्ट सुरू आहे. या मॅचमध्ये रोहित शर्माने (Rohit Sharma) इतिहास घडवला आहे.

अहमदाबाद, 24 फेब्रुवारी : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात मोटेरा स्टेडियममध्ये पिंक बॉल टेस्ट सुरू आहे. मॅचच्या पहिल्या दिवशी टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या इंग्लंडचा 112 रनवर ऑल आऊट झाला. भारताकडून अक्षर पटेल (Axar Patel) याने 6 तर अश्विनने (R. Ashwin) 3 विकेट घेतल्या. पिंक बॉल टेस्टमध्ये पाच पेक्षा जास्त विकेट घेणारा अक्षर पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला. बॉलिंगमध्ये अक्षरने तर त्यानंतर बॅटिंगमध्ये रोहित शर्माने (Rohit Sharma) इतिहास घडवला.

घरातल्या मैदानात 6 हजार आंतरराष्ट्रीय रन करणारा 9वा भारतीय बॅट्समन ठरला. रोहितआधी सचिन तेंडुलकर (14192 रन), विराट कोहली (9688 रन)*, राहुल द्रविड़ (9004 रन), वीरेंद्र सेहवाग (7796 रन), महेंद्र सिंह धोनी (7575 रन), मोहम्मद अझरुद्दीन (6575 रन), सौरव गांगुली (6410 रन), सुनील गावस्कर (6259 रन) यांनी हा विक्रम केला.

याशिवाय रोहितने आणखी एक रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केलं. रोहित टेस्ट, वनडे आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये अडीच हजार रन करणारा जगातला तिसरा खेळाडू ठरला. रोहितआधी विराट कोहली (Virat Kohli) आणि मार्टीन गप्टील (Martin Guptill) यांच्या नावावर हे रेकॉर्ड आहे. याचसोबत रोहित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये एक हजार रन पूर्ण करण्याच्या जवळही पोहोचला आहे. रोहितने 10 मॅचमध्ये 900 पेक्षा जास्त रन केले आहेत. भारताकडून फक्त अजिंक्य रहाणेनेच या स्पर्धेत एक हजारपेक्षा जास्त रन केले आहेत. रोहितने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये चार शतकं आणि एक अर्धशतक केलं आहे.

इंग्लंडविरुद्धच्या या सीरिजमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने तीन टेस्टमध्ये आतापर्यंत 238 रन केले आहेत. चेन्नईमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये रोहितने 161 रनची खेळी केली होती. इंग्लंडचा कर्णधार जो रूट सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. रूटने 3 मॅचमध्ये 314 रन केले आहेत. रूटने सीरिजच्या पहिल्या टेस्टमध्ये द्विशतक केलं होतं.

First published:
top videos

    Tags: Cricket news, IND Vs ENG, Record, Rohit sharma, Sports