Home /News /sport /

IND vs ENG : अक्षरच्या धमाक्यानंतर रोहितचं अर्धशतक, दिवसाअखेर भारताने गमावल्या 3 विकेट

IND vs ENG : अक्षरच्या धमाक्यानंतर रोहितचं अर्धशतक, दिवसाअखेर भारताने गमावल्या 3 विकेट

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टचा पहिला दिवस भारताचा (India vs England) राहिला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाचा स्कोअर 99-3 एवढा झाला आहे. मागच्या मॅचमध्ये शतक करणाऱ्या रोहित शर्मा (Rohit Sharma)ने या मॅचमध्येही नाबाद अर्धशतक केलं आहे.

पुढे वाचा ...
    अहमदाबाद, 24 फेब्रुवारी : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टचा पहिला दिवस भारताचा (India vs England) राहिला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाचा स्कोअर 99-3 एवढा झाला आहे. मागच्या मॅचमध्ये शतक करणाऱ्या रोहित शर्मा (Rohit Sharma)ने या मॅचमध्येही नाबाद अर्धशतक केलं आहे. रोहित 57 रनवर नाबाद खेळत आहे, तर अजिंक्य रहाणे 1 रनवर खेळत आहे. भारत अजून 13 रननी पिछाडीवर आहे. शुभमन गिल 11 रनवर, चेतेश्वर पुजारा शून्य रनवर तर कर्णधार विराट कोहली 27 रनवर आऊट झाला. इंग्लंडकडून जॅक लीचने 2 तर जोफ्रा आर्चरला एक विकेट मिळाली. त्याआधी टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या इंग्लंडचा भारताने 112 रनवर ऑल आऊट केला. भारताकडून अक्षर पटेल (Axar Patel) ने 6, अश्विनने 3 तर आपली 100 वी टेस्ट खेळणाऱ्या इशांत शर्माने एक विकेट घेतली. इंग्लंडकडून झॅक क्रॉलेने सर्वाधिक 53 रनची खेळी केली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) च्या दृष्टीने ही टेस्ट दोन्ही टीमसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातली ही टेस्ट डे-नाईट असल्यामुळे गुलाबी बॉलने खेळवण्यात येत आहे. या मॅचसाठी भारताने टीममध्ये दोन तर इंग्लंडने चार बदल केले. दुसऱ्या टेस्टमध्ये विश्रांती देण्यात आलेल्या जसप्रीत बुमराहचं (Jasprit Bumrah) या मॅचमध्ये पुनरागमन झालं आहे. मोहम्मद सिराजच्या जागी बुमराहचा समावेश करण्यात आला आहे. तसंच वॉशिंग्टन सुंदरला कुलदीप यादवच्या जागेवर संधी देण्यात आली आहे. इंग्लंडच्या टीममध्ये देखील चार बदल करण्यात आले आहेत. जॉनी बेअरस्टो, जेम्स एंडरसन, जोफ्रा आर्चर आणि झॅक क्राऊलीचा इंग्लंडच्या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. भारतीय टीम विराट कोहली, शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा इंग्लंडची टीम जो रुट, डॉम सिबले, झॅक क्राऊली, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, ओली पोप, बेन फोक्स, जोफ्रा आर्चर, जॅक लीच, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या