मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : मोटेरामध्ये कोण कोणावर भारी? जाणून घ्या रेकॉर्ड

IND vs ENG : मोटेरामध्ये कोण कोणावर भारी? जाणून घ्या रेकॉर्ड

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या तिसऱ्या पिंक बॉल टेस्टला 24 तारखेपासून अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियम (Motera Stadium) मध्ये सुरूवात होणार आहे.

अहमदाबाद, 22 फेब्रुवारी : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या तिसऱ्या पिंक बॉल टेस्टला 24 तारखेपासून अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियम (Motera Stadium) मध्ये सुरूवात होणार आहे. ही टेस्ट डे-नाईट असल्यामुळे गुलाबी बॉलने खेळवली जाईल. मोटेरा स्टेडियमवरचं रेकॉर्ड बघितलं तर ही खेळपट्टी कायमच स्पिन बॉलिंगला मदत करणारी राहिली आहे. मोटेराच्या मैदानात झालेल्या 12 टेस्टमध्ये स्पिनरनी फास्ट बॉलरपेक्षा दुप्पट विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे या सीरिजमध्ये सर्वाधिक 17 विकेट घेणाऱ्या अश्विनचा फॉर्म भारतासाठी महत्त्वाचा असेल. चार मॅचची ही सीरिज सध्या 1-1 ने बरोबरीत आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात मोटेरा स्टेडियममध्ये 2 मॅच झाल्या आहेत. यातल्या एक मॅचमध्ये टीम इंडियाचा विजय झाला, तर एक मॅच ड्रॉ झाली आहे. भारतीय स्पिनरनी या मैदानात झालेल्या 12 मॅचमध्ये 32 च्या सरासरीने 123 विकेट घेतल्या, यात 8 वेळा इनिंगमध्ये 5 विकेट तर 3 वेळा मॅचमध्ये 10 विकेटचा समावेश आहे. स्पिनरनी टाकलेल्या 1622 ओव्हरपैकी 400 ओव्हर मेडन आहेत. भारताच्या 32 स्पिनरनी या मैदानात बॉलिंग केली आहे. तर फास्ट बॉलरना या मैदानात 12 टेस्टमध्ये फक्त 59 विकेट मिळाल्या आहेत. यात दोन वेळा इनिंगमध्ये 5 आणि एकवेळा मॅचमध्ये 10 विकेटचा समावेश आहे. 26 फास्ट बॉलरनी या मैदानात 737 ओव्हर टाकल्या आहेत, यापैकी 157 ओव्हर मेडन आहेत.

इंग्लंडच्या टीमने या मैदानात दोन टेस्ट खेळल्या. यात 9 फास्ट बॉलरना फक्त 5 विकेट मिळाल्या, तर स्पिनरनी 15 विकेट काढल्या. हे रेकॉर्ड बघता तिसऱ्या टेस्टमध्ये स्पिनर आणि भारताचं रेकॉर्ड वरचढ ठरत आहे.

First published: